Nagpur News : दुसऱ्या पसंतीक्रमात वंजारींची विजयी आघाडी; मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी सुरूच

नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचे चित्र तब्बल ४० तासांनंतरही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
abhijit vanjari

abhijit vanjari

sakal

Updated on: 

नागपूर - नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचे चित्र तब्बल ४० तासांनंतरही स्पष्ट होऊ शकलेले नाही. विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला गाठता न आल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असून, बुधवारी मध्यरात्रीपर्यंत निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत ४ हजार २९४ मतांची आघाडी घेणारे भाजपचे सुधाकर कोहळे यांची ही आघाडी काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी दुसऱ्या पसंतीच्या फेऱ्यांमध्ये वेगाने कमी केल्याने लढत अत्यंत चुरशीची बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com