Nagpur : व्हायरलने नागपूरकर फणफणले ; विषाणूच्या संक्रमणा

निदान नाही पण एच३ एन२ इन्फ्लुएंझाची लक्षणे, रुग्ण वाढले
Viral infection
Viral infectionesakal

नागपूर : कोविड महामारीनंतर अचानक ताप खोकला, उलट्या अशी लक्षणे असलेल्या मुलांची संख्या शहरात वाढत आहे. एकूण तपासण्यात आलेल्या रुग्णांमध्ये दोन ते तीन टक्के मुलांना अशी एच३ एन२ इन्फ्लूएंझाची लक्षणे दिसत आहेत. शहरभरच तापाची फणफण वाढली आहे.

विषाणूच्या संक्रमणाचा (व्हायरल इंफेक्शन) धोका वाढला आहे. विशेष असे की, नमूने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येत आहेत. उपराजधानीत हे नमुने तपासणीची सोय नाही.

शहरात सध्या एच३ एन२ या इन्फ्लूएंझाची साथ नसली तर या इन्फ्लूएंझाची लक्षणे असलेल्या रुग्ण आढळत आहेत. नागपुरातील विविध भागातून असे अनेक रुग्ण मेडिकल, मेयोतही पोहोचले आहेत, ज्यांना गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तीव्र तापासह खोकला आहे.

या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून लिंबू पाणी, ओआरएससारखे लिक्विड घ्यावे. याशिवाय प्रथिनांची संख्या जास्त असलेला आहार घ्यावा, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे म्हणाले.

Viral infection
Nagpur : नागपुरातून सुटणाऱ्या सहा एक्‍स्प्रेस रद्द

लक्षणे

  • धाप लागणे

  • ऑक्सिजन पातळी

  • कमी होणे

  • उलट्या होणे

  • ताप येणे

  • यांनी घ्यावी काळजी

  • दम्याचे रुग्ण

  • हृदयरोग किंवा

  • संबंधित समस्या

  • किडनीचे रुग्ण

  • गर्भवती स्त्री

Viral infection
Nagpur : गारेगार आईसक्रीमला महागाईच्या झळा ; दुधासह कच्च्या मालाची दरवाढ

एच-३ एन-२ इन्फ्लूएंझाची लक्षणे असलेले रुग्ण आढळत आहेत. त्यांचे नेमके निदान होत नाही. यामुळे काळजी घेताना हात नियमितपणे साबणाने धुत राहावे. सॅनिटायझरचा वापर करावा. आजारी व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे. शिंक किंवा खोकला आल्यास तोंडावर रुमाल ठेवावा. यातून व्हायरल इन्फेक्शन लवकर पसरते. विशेष असे की, गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करावा.

-डॉ. अविनाश गावंडे,बालरोग तज्ज्ञ, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com