Nagpur Gets Woman Mayor
esakal
गेल्या काही दिवसांपासून नागपूरचा महापौर-उपमहापौर कोण होईल, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, आज अखेर या नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपने नागपूरच्या महापौरपदासाठी नीता ठाकरे तर उपमहापौर पदासाठी लीला हातीबेड यांचं नाव जाहीर केलं आहे. भाजपाचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. याशिवाय स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवाणी दाणी यांच्या नाव निश्चित झाल्याचं समजतं आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.