नागपूर : बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

रोजगाराची समस्या दिवसेंदिवस भीषण
Nagpur Youth suicide due to unemployment
Nagpur Youth suicide due to unemploymentsakal

नागपूर : रोजगाराची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. त्यातूनच एका २७ वर्षीय तरुणाने बेरोजगारीला कंटाळून अंबाझरी तलावात उडी घेत, स्वतःची जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास समोर आली.

प्रणय राजेश गायसमुद्रे (वय २७, रा. लिबर्टी टॉकीज, सदर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कालपासून तो बेपत्ता होता. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह अंबाझरी तलावात तरंगताना आढळला. दरम्यान याबाबत अंबाझरी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. प्रणय गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. त्याने बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यावर काही कोर्सेसही केले. मात्र, त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो दिवसेंदिवस तणावात असल्याचे दिसून आले. शुक्रवारी रात्री बाहेर गेल्यावर तो घरी परत आला नाही.

त्यामुळे आई-वडिलांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, शनिवारी सकाळी त्याच्या मृत्यूची वार्ता घरी पोहचली. प्रणयचे वडील आरोग्य विभागात असून आई परिचारिका म्हणून काम करते. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी वडिल राजेश कृष्णराव गायसमुद्रे (वय ५२) यांच्या सुचनेवरुन अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com