नागपूर : अनेक जि. प. शाळांचा मालक दुसराच!

४९ शाळांकडे मालकी कागदपत्र; अहवाल सादर करण्याच्या सूचना
nag zp
nag zpe sakal

नागपूर : खासगी शाळांना स्वतःच्या जागेसाठी आग्रही असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळाच दुसऱ्याच्या जागेवर उभ्या आहेत. तर अनेक शाळांच्या जागेचा मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीकडे असल्याची धक्कादायक धक्कादायक माहिती समोर आली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक १५३० शाळा आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल विद्यार्थीच जास्त शिक्षण घेतात. आजही जिल्ह्यातील १९६ जि.प. च्या शाळा या जरी त्यांच्या जागेवर असल्या तरी त्यांची मालकीहक्क हे खासगी व्यक्तीकडे आहे. तर १५७ शाळा या आजही वनविभागाच्या जागांवर भर आहे. ३४ शाळांची शेत जमीन ही खासगी मालकीच्या आहेत. तर आजही सुमारे ४९ शाळांकडे स्वमालकिची जागा जरी असली तरी मालमत्तेचे कागदपत्र उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.

nag zp
दक्षिण मुख्यालयातर्फे लघुपट व चित्रकला ऑनलाइन स्पर्धा

या सर्व प्रकाराची मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी त्वरित संबंधित शाळांनी आपापल्या स्तरावर सभा घेऊन शाळांची जागा, मालमत्ता, शासनाच्या नावाने करण्याच्या प्रक्रियेस सुरवात करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. अहवाल सादर करण्यास दिरंगाई अथवा हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अनेक शाळांची मालकी नाही. त्यामुळे त्या नावे करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. यासाठी पंचायत विभागाच्या डेप्युटी सीईओंना नोडल अधिकारी म्हणून नेमले आहे. मालमत्ता शासनाच्या नावावर करण्यासाठी त्याचे दस्तऐवज जमा करून तो सर्व रेकॉर्ड महसूल विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

- योगेश कुंभेजकर, सीईओ जि.प. नागपूर

५२० शाळा

महाराष्ट्र शासनाच्या जागेवर

१९६ शाळा

खासगी मालकी

१५७ शाळा

वनविभागाच्या जागेवर

१७ शाळा

जनपद

१९ शाळा

जि.प.

११ शाळा

डब्ल्यूसीएल/खदान

४ शाळा

नझूल जागेवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com