भाजपला मोठे भगदाड पडणार; नाना पटोले यांनी वर्तविले भाकित

Nana Patole
Nana PatoleNana Patole

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपचे मोठमोठे नेते काँग्रेसमध्ये (Congress) दिसतील असे सांगून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला मोठे भगदाड पडणार असल्याचे भाकित वर्तविले. माजी उपमहापौर तसेच भाजपने निलंबित केलेले नगरसेवक सतीश होले यांच्या पक्षप्रवेशाप्रसंगी ते बोलत होते. शहरातील सोमवारी क्वार्टरमधील एका उद्यानात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

ही तर आता सुरुवात आहे. यापुढे नागपूरकरांना भाजपमधील मोठमोठ्या नेत्यांचे काँग्रेस (Congress) प्रवेश झाल्याचे बघायला मिळेल. भाजपने नागपूरकरांना दिलेली आश्‍वासने तर पूर्ण केलीच नाहीच तसेच कार्यकर्त्यांना दिलेले शब्द देखील पाळले नाहीत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. ही चीड महानगपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला बघायला मिळणार आहे, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Nana Patole
काँग्रेसवर काय वेळ आली! गर्दी जमवण्यासाठी महिलांना दिले १०० रुपयांचे कुपन

मेट्रो रेल्वे आणि सिमेंट रस्त्यांच्या कामात जनतेच्या पैशांची लूट केली. जनतेवर कराचा बोझा लादला. भाजपचे (BJP) नगरसेवक प्रभागांमध्ये फिरलेच नाहीत. पिण्याच्या पाण्याच्या वितरणापासून सर्वच सुविधांचे खाजगीकरण केले. आपल्या कंपन्यांना कामे वाटप केली. याचा फटका आता जनतेला बसत आहे, असेही नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

सतीश होले काँग्रेसमध्ये दाखल

मूळचे काँग्रेसचे असलेले नगरसेवक सतीश होले यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. नगरसेवक असताना सतीश होले यांना काँग्रेसने तिकीट नाकारली होती. त्यानंतर तीनच प्रभाग असताना स्वबळावरून निवडून येऊन त्यांनी आपली ताकद दाखवली. दहा वर्षे भाजपसोबत (BJP) त्यांचा घरोबा होता. ते उपमहापौरसुद्धा होते. या दरम्यान काँग्रेसची मोठी पडझड झाली. २९ नगरसेवक असलेल्या काँग्रेसलाही महापालिकेच सक्षम उमेदवारांची गरज आहे. त्यामुळे होले यांना स्वगृही परतताना कोणी फारसा विरोध दर्शवला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com