esakal | नागपुरात कोरोनानं पुन्हा घेतली उसळी; आज नवे ७५०३ बाधित तर ८५ रुग्णांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

नागपुरात कोरोनानं पुन्हा घेतली उसळी; आज नवे ७५०३ बाधित तर ८५ रुग्णांचा मृत्यू
नागपुरात कोरोनानं पुन्हा घेतली उसळी; आज नवे ७५०३ बाधित तर ८५ रुग्णांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होताना दिसत असतानाच प्रादुर्भावाच्या साखळीने अचानक उसळी घेतली आहे. जिल्ह्यात बुधवारी ७ हजार ५०३ जण कोरोनाच्या विळख्यात अडकले. तर उपचार घेत असलेल्या ८५ बाधितांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष असे की, शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये मृत्यू वाढले आहेत. शहरात ३७ तर ग्रामीण भागात ३८ मृत्यू झाले.

हेही वाचा: दुचाकी वेगात चालविण्यावरून झाला वाद आणि घडला मन हेलावून टाकणारा हत्याकांड

जिल्ह्यात सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती ७७ हजार १८७ झाली आहे. यातील ४६ हजार ३५३ कोरोनाबाधित शहरातील आहेत. तर ३० हजार ८३४ कोरोनाबाधित ग्रामीण भागातील आहेत. मागील आठ दिवसांच्या तुलनेत कोरोना चाचण्यांची संख्या अचानक वाढली असून २६ हजार ५२५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामुळे आतापर्यंत २२ लाख २६ हजार ८२७ चाचण्यांची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यातील १५ लाख २२ हजार ९१५ चाचण्या आरटीपीसीआर आहेत. तर उर्वरित ७ लाख ३ हजार ९१२ चाचण्या या रॅपिड ॲन्टिजेन आहेत. विशेष असे की, यात खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळांमध्ये झालेल्या चाचण्यांची संख्या पन्नास टक्के आहे.

बुधवारी दगावलेल्या ८५ मृतकांमध्ये शहरातील ३७ तर ग्रामीण भागातील ३८ जणांचा समावेश आहे. तर १० जणांना बाहेरच्या जिल्ह्यातून रेफर करण्यात आले होते. त्यांचाही मृत्यू झाला. अशाप्रकारे शहरात ४ हजार ३९२ मृत्यू शहरातील आहेत. तर उर्वरित १ हजार ७८१ मृत्यू ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्याबाहेरील १ हजार ३८ मृत्यूंमुळे एकूण ७ हजार २११ मृतांची संख्या झाली. शहरात ४ हजार ८०३, ग्रामीण २ हजार ६९०, जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ७ हजार ५०३ नवीन कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ८६ हजार २३१ झाली आहे. तर ग्रामीण भागात १ लाख ६ हजार ३७९, झाली आहे.

रुग्णालयात ९ हजार बाधित

जिल्ह्यात ७७ हजार १८७ सक्रिय बाधित आहेत. यातील ६० हजार ६६० बाधित घरीच (गृहविलगीकरणात) उपचार घेत आहेत. तर ९ हजार २४ रुग्ण मेयो, मेडिकल, एम्ससह विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात बुधवारी आलेल्या ७ हजार ५०३ कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

हेही वाचा: नागरिकांनो सावधान! तुमच्या खिशातील नोटा डुप्लिकेट तर नाहीत ना? शंभर, दोनशेंच्या नोटांमध्ये गडबड

६९३५ कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९३ हजार ८३० जणांना विषाणूने गाठले असल्याची नोंद झाली. तर आतापर्यंत ७ हजार २२८ मृत्यू जिल्ह्यात झाले. ६ हजार ९३५ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे ठणठणीत बरे झालेल्यांची संख्या ३ लाख ९ हजार ४१५ झाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ