esakal | विदर्भात १०२८ कोटींचे रस्ते होणार; नितीन गडकरी यांनी दिली ७७ प्रकल्पांना मंजुरी

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी
विदर्भात १०२८ कोटींचे रस्ते होणार; नितीन गडकरी यांनी दिली ७७ प्रकल्पांना मंजुरी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्रातील २०४० कोटींच्या २७२ प्रकल्पांना गुरुवारी केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. यात विदर्भातील १०२८ कोटींच्या ७७ प्रकल्पांचा यात समावेश आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला या मंजूर कामाची यादी पाठविली असून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ही सर्व कामे होणार आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! ऑक्सिजन मास्क फेकून कोरोनाग्रस्ताचं रुग्णालयातून पलायन; परिसरात कोरोना संसर्गाची भीती

उपराजधानी नागपूरला १२ प्रकल्प मिळाले असून या प्रकल्पांची किंमत १४५.६९ कोटी रुपये आहे. जिल्ह्यातील काटोल येथील रेस्ट हाऊस ते मटन मार्केट, कुही तालुक्यातील वाग वीरखंडी तारना येथील लहान व मोठा पूल बांधकाम, नागपुरातील कळमना उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे सर्व्हिसिंग रोड, इनर रिंगरोडजवळ लहान पूल व भिंतीचे बांधकाम, थातुरवाडा, बेलाभिष्णूर, तिनखेडा, खरसोली, नरखेड, मोहाडी ते मध्यप्रदेश सीमेपर्यंतचा रस्ता, रामटेक तालुक्यातील छत्तरपूर, बोर्डा, खुमारी, भोंडेवाडा, भंडारबोडी, अरोली रस्त्यावरील लहान पुलाचे बांधकाम, सीपीआरएफ प्रवेशद्वार लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन, रायसोनी कॉलेज, लता मंगेशकर हॉस्पिटल, शिवणगाव सीमेपर्यंत रस्त्यात सुधारणा, उमरेड तालुक्यातील बेला ठाणा रस्ता यात आहेत.

हेही वाचा: कन्हान रुग्ण मृत्यूप्रकरण: आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत, जबाबदारी घेणार कोण? संतप्त कुटुंबीयांचा प्रश्न

तसेच नरसाळा गारगोटी ते दिघोरी नाका ते खरबी, जिजामाता नगर ते तरोडी, बिडगाव, कापसी पावनगाव, घोरपड रोड, रस्त्याचे बांधकाम, नरसाळा गारगोटी ते दिघोरी नाका ते खरबी, जिजामाता नगर ते तरोडी, बिडगाव, कापसी पावनगाव, घोरपड रोड, रस्त्याचे बांधकाम, मोवाड, खरसोली, जुनोना, घराड,थुगाव, निपाणी, उमरी, वाडेगाव, मोहाडी, धोत्रा, तोलापार, मोगरा रस्त्यावर खरसोली गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम, जुनी कामठी येथे पुलाचे बांधकाम यामाध्यमातून होणार आहे. याशिवाय अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील रस्त्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ