Nitin Gadkari : मताधिक्याची गुढी उभारण्यासाठी आशीर्वाद द्या ; नोकरीसाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही

शिक्षण, आरोग्य, पर्यटन, एव्हिएशन, रोजगार, लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये नागपूरला लौकीक प्राप्त करून देण्याचा गेल्या दहा वर्षांमध्ये प्रामाणिक प्रयत्न केला. उत्तम रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग निर्माण करून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकले.
Nitin Gadkari
Nitin Gadkari sakal

नागपूर : शिक्षण, आरोग्य, पर्यटन, एव्हिएशन, रोजगार, लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये नागपूरला लौकीक प्राप्त करून देण्याचा गेल्या दहा वर्षांमध्ये प्रामाणिक प्रयत्न केला. उत्तम रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग निर्माण करून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. आता निवडणुकीत विक्रमी मतांची गुढी उभारण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.

तेली समाज बांधवांच्या वतीने जवाहर वसतिगृहाच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, रमेश गिरडे, दिलीप तुपकर, नाना ढगे, ईश्वर बाळबुधे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी विविध संस्था व मंडळांच्यावतीने नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. समाज आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास उपस्थितांनी दिला.

गडकरी म्हणाले, ‘नागपूरने एज्युकेशन हबच्या दिशेने आधीच वाटचाल सुरू केली आहे. याठिकाणी सिम्बायोसिस, ट्रिपल आयटी, आयआयएम यासारख्या मोठ्या शिक्षण संस्था आल्या. लवकरच चाळीस एकरमध्ये नरसी मोनजी नावाची प्रसिद्ध शिक्षण संस्था नागपुरात येणार आहे. भविष्यात आपल्या शहरातील तरुणांना शिक्षणासाठी मुंबई-पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

Nitin Gadkari
Nagpur Loksabha Constituency : हत्तीची ‘माया’ कोणावर? ; गुरुवारी बहनजींची सभा,उमेदवारांचे वाढले टेंशन

आजवरच्या राजकीय कारकिर्दीत ४० ते ४५ हजार लोकांचे हार्ट ऑपरेशन करून दिले. कृत्रिम अवयव वितरित करून दिव्यांगांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. कर्णयंत्र देऊन, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून ज्येष्ठांची सेवा केली. आतापर्यंत १ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मदत केली. समाजसेवेसाठीच राजकारणात आलो आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com