esakal | कोरोना रुग्णांनो, महत्वाची बातमी! आता तज्ज्ञ करणार तुमचे समुपदेशन.. हे आहेत डॉक्टर आणि त्यांचे नंबर.. वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

Now counselling of doctors will available to corona patients

नागपूरच्या सायकीॲट्रिक सोसायटीने कोरोना रुग्णांसाठी समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दररोज सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत नि:शुल्क मार्गदर्शन करणार आहेत.

कोरोना रुग्णांनो, महत्वाची बातमी! आता तज्ज्ञ करणार तुमचे समुपदेशन.. हे आहेत डॉक्टर आणि त्यांचे नंबर.. वाचाच

sakal_logo
By
निलेश डोये

नागपूर : कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासह बाधित रुग्णांना मानसिक ताणतणावातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेतला असून 14 डॉक्टर दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

नागपूरच्या सायकीॲट्रिक सोसायटीने कोरोना रुग्णांसाठी समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दररोज सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत नि:शुल्क मार्गदर्शन करणार आहेत. सायकीॲट्रिक सोसायटी ऑफ नागपूरचे डॉ. सुलेमान विराणी व डॉ. अभिषेक सोमानी यांनी कोविड समुपदेशनसंदर्भात माहिती दिली. 

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

कोरोना रुग्णांच्या समुपदेशनसाठी सोमवार ते रविवार दररोज रात्री दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी रुग्णांना दिलेल्या दूरध्वनीवर तज्ज्ञ डॉक्टरांसोबत संवाद साधायचा आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांनी मानसिक आजारासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांना दिलेल्या वेळेत दूरध्वनीवर संपर्क साधावा व आपल्या आजारासंदर्भात असलेल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

मानसोपचार तज्ज्ञ व त्यांची उपलब्ध वेळ : 

सायंकाळी 6 ते रात्री 7 वाजेपर्यंत

सोमवार - डॉ. कुमार कांबळे (7558483467) 

मंगळवार - डॉ. आभा बंग सोनी(8080072674) 

बुधवार - डॉ. नेहा भावे सालनकर (9112233920) 

गुरुवार - डॉ. सागर चिद्दरवार (9657018165) 

शुक्रवार - डॉ. प्रिया मडावी (8975767040) 

शनिवार - डॉ.सयद साकिब (9657555644) 

रविवार - डॉ. अक्षय सरोदे (8828171697) 

क्लिक करा - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचवला कोविड नियंत्रणासाठी उपाय, वाचा काय म्हणाले ते...


रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत

सोमवार - डॉ. एन. जे सावजी (9963207019)

मंगळवार - डॉ. रवी ढवळे (9960958582)

बुधवार - डॉ. श्रेयस मागिआ (7720067581)

गुरुवार - डॉ. प्रदीप पाटील (8999248979)

शुक्रवार - डॉ. दुर्गा बंग (9422802530)

शनिवार - डॉ. अभिषेक सोमानी (9403363163)

 रविवार - डॉ. एन. जे. सावजी (9763207019)


संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top