ट्रेन नागपूर स्थानकावर येताच होऊ लागला श्वास घेण्यास त्रास, पाहता पाहता वृद्धाचा मृत्यू

Another corona positive patient dies
Another corona positive patient dies esakal

नागपूर : रेल्वे प्रवासादरम्यान श्वास घेण्यात अडचण (difficulty in breathing) येऊ लागली आणि पाहता पाहता वृद्ध प्रवाशाने प्राण सोडले. कोरोनाशी (coronavirus) संबंधित लक्षणे असल्याने अन्य प्रवाशांसह रेल्वेकर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. काहींनी मात्र प्रवाशांची संख्या अधिक असल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. सोमवारी सकाळी नागपूर स्थानकावर (nagpur railway station) हा संपूर्ण घटनाक्रम घडला. (old traveler died due to difficulty in breathing in ernakulam patna express on nagpur railway station)

Another corona positive patient dies
मृतदेह बदलल्याने संतापाचा उद्रेक; मोक्षधामात उघडकीस आला प्रकार

बखोरी शिवान पासवान (७०) रा. सुमेरा, जि. जहानाबाद (बिहार) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. त्यांचा मुलगा सत्येंद्रने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड महिन्यांपासून बखोरी यांची तब्येत खराब होती. यामुळेच दोघेही घरी परतत होते. ०६३५९ एर्नाकुलम - पटना स्पेशल एक्स्प्रेसच्या एस-८ कोचमधून त्यांचा प्रवास सुरू होता. ही गाडी सकाळी ७ वाजताच्या सुमारात नागपूर स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वर येऊन थांबली. त्याचवेळी बखोरी यांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. सत्येंद्रने त्यांना धीर देत शांत करण्याचा प्रयत्न केला. श्वास घेण्यात त्रास आणि ते सतत खोकलत असल्याने अन्य प्रवाशांनी त्यांना कोरोना झाल्याचा अंदाज बांधला. तशी कुजबूज डब्यात सुरू झाली. गाडी रवाना होत असताना बखोरी यांचा त्रास अगदीच असह्य झाला. सत्येंद्रने चेन ओढून रेल्वे थांबवून घेतली. चेनपुलींग झाल्याने फलाटावरील पोलीस संबंधित डब्याजवळ पोहोचले. सत्येंद्रने त्यांना वडिलांच्या तब्येतीबाबत माहिती देत त्यांना खाली उतरवून गेतले. तातडीने रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यांना तपासताच मृत घोषित केले. कोरोनाच्या धास्तीने कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली. काहींनी डब्यात क्षमतेपेक्षा फार अधिक प्रवासी असल्याने श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला.

Another corona positive patient dies
आमचा वाली कोण? आइस फ्रूट, सरबत विक्रेते हतबल; उपचारासाठी पैसे नाहीत

डब्यात ११० प्रवासी? -

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच रेल्वेत प्रवेश दिला जात आहे. त्यातही प्रवासी संख्या पुरेशी नसल्याने रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत आहेत. पण, पासवान पितापुत्र प्रवास करीत असलेल्या डब्यात ११० प्रवासी असल्याचा दावा त्याच डब्यातील प्रवाशांना केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com