esakal | अखेर ते ठरले द्रोणाचार्य! पॅरालिम्पिकपटूला तब्बल ११ वेळा पुरस्काराने दिली हुलकावणी.. काय आहे त्यांची यशोगाथा.. वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Paralympic player Vijay munishwar got Dronacharya award

55 वर्षीय मुनिश्वर यांची नुकतीच पॅरा पॉवरलिम्पिकमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. द्रोणाचार्य, छत्रपती, अर्जुना आणि दादोजी कोंडदेव हे चार पुरस्कार मिळविणारे विदर्भ व महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहेत,

अखेर ते ठरले द्रोणाचार्य! पॅरालिम्पिकपटूला तब्बल ११ वेळा पुरस्काराने दिली हुलकावणी.. काय आहे त्यांची यशोगाथा.. वाचा

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी माझी 2006 पासून आतापर्यंत तब्बल अकरा वेळा शिफारस करण्यात आली. परंतु प्रत्येक वेळी पुरस्काराने हुलकावणी दिली. उशिरा का होईना जीवनगौरव कॅटेगरीतला पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद आहे. हा पुरस्कार मी आतापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज असल्याची भावना द्रोणाचार्य, छत्रपती, अर्जुन व दादोजी कोंडदेव पुरस्कारविजेते माजी पॅरालिम्पिकपटू व ज्येष्ठ क्रीडा संघटक विजय मुनिश्वर यांनी व्यक्त केली.

55 वर्षीय मुनिश्वर यांची नुकतीच पॅरा पॉवरलिम्पिकमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. द्रोणाचार्य, छत्रपती, अर्जुना आणि दादोजी कोंडदेव हे चार पुरस्कार मिळविणारे विदर्भ व महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहेत, हे उल्लेखनीय. पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मुनिश्वर म्हणाले, सर्वात मोठा पुरस्कार मिळाल्याचा अर्थातच खूप आनंद झाला. 

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

वास्तविक 2006 मध्येच प्रशिक्षक कॅटेगरीत पुरस्काराची अपेक्षा होती. दुर्दैवाने त्यावेळी पुरस्कार मिळू शकला नाही. गेल्या 14 वर्षांत तब्बल अकरा वेळा पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. उशिरा का होईना माझ्या कामगिरीची दखल घेण्यात आली. मी मागील 25 वर्षांमध्ये प्रशिक्षक म्हणून केलेल्या मेहनतीचे फळ आहे. रामाप्रमाणेच माझाही पुरस्काररुपी वनवास संपला. या पुरस्कारामुळे आणखी नव्या जोमाने व ऊर्जेने काम करणार असल्याचे ते म्हणाले.

आतापर्यंत अनेक पदकांची कमाई 

वेकोलित सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले मुनिश्वर यांना 1990 मध्ये राज्य शासनाचा छत्रपती, 2000 मध्ये केंद्र शासनाचा अर्जुना व 2006 मध्ये दादोजी कोंडदेव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मुनिश्वर यांनी खेळाडू म्हणून एक दशकापेक्षा अधिक काळात महाराष्ट्र व देशासाठी असंख्य पदके जिंकलीत. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी 54 सुवर्णपदके जिंकली, तर विविध देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी तीन सुवर्णांसह नऊ पदकांची कमाई केली. सहा पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. तब्बल 31 देशांमधील स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला.

अधिक माहितीसाठी - पतीला तिळतिळ मरताना बघू शकत नाही.. असं म्हणत तिनं उचललं टोकाचं पाऊल.. आणि सगळंच संपलं

घडवले आंतरराष्ट्रीय खेळाडू

प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी पन्नासच्या वर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. यात पॅरालिम्पिकपटू राजेंद्रसिंग राहेलू, फरमान बाशा, सचिन चौधरी आशियाई पदकविजेती नागपूरची लतिका माने या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या अर्जुना, छत्रपती व एकलव्य पुरस्कारविजेत्या खेळाडूंनी आशिया, वर्ल्ड, कॉमनवेल्थ व पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये 35 च्या वर आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच व तांत्रिक अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. मुनिश्वर यांनी खेळासह सामाजिक बांधिलकीही जपली आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल 10९ वेळा रक्तदान केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top