१८ जून रोजी निषेध दिन; खासगी डॉक्टर नोंदवणार हल्ल्यांचा निषेध

१८ जून रोजी निषेध दिन; खासगी डॉक्टर नोंदवणार हल्ल्यांचा निषेध

नागपूर : जागतिक सरासरीपेक्षा भारतामध्ये बळी पडलेल्यांची संख्या १.२७ आहे. ही लक्षणीयरीत्या कमी आहे. कोरोना मृत्यूदर कमी राखण्यात सरकारी तसेच खासगी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न आहेत. तरीदेखील डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यात शासन (The government has failed to stop the attacks on doctors) कमी पडले. यामुळेच अशा घटनांचा १८ जून रोजी देशभर निषेध (Protests across the country on June 18) करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरातही निषेध दिन पाळला जाईल, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे (Dr. Sanjay Devtale) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Private-doctors-to-register-protest-on-June-18)

कोरोना आजाराचा सर्वसाधारण जागतिक मृत्यूदर २.१६ टक्के आहे. सुदैवाने भारतात हा मृत्यूदर १.२७ टक्के आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार देशातील ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जनता ही खासगी आरोग्यसेवा घेते. यामुळे खासगी आरोग्य यंत्रणांचा सिंहाचा वाटा यात आहे. असे असताना दुर्दैवाने दीड वर्षांमध्ये आरोग्य यंत्रणांवर, आरोग कर्मचाऱ्यांवर आणि रुग्णालयांमध्ये देशात २७२ हल्ले झाले. तर महाराष्ट्रात ५७ डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत.

१८ जून रोजी निषेध दिन; खासगी डॉक्टर नोंदवणार हल्ल्यांचा निषेध
जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याच्या मृत्यू; एक गंभीर

सर्वसाधारण दर महिन्याला एक तरी डॉक्टर हा कुठल्यातरी रुग्णाच्या नातेवाइकांच्या हल्ल्याचा बळी पडतो. सुसंस्कृत महाराष्ट्राला ही बाब भूषणावह नाही. महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना आणि वैद्यकीय व्यावसायिक हिंसाचार प्रतिबंध आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा २०१० अस्तित्वात आला खरा, परंतु ११ वर्षांत या कायद्याअंतर्गत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ ३ प्रकरणांचे निकाल आले आहेत. प्रत्यक्षात आरोपीला शिक्षा झालेल्याचे एकही प्रकरण नाही. यामुळे या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी डॉ. प्रकाश देव यांनी केली आहे.

अशा आहेत मागण्या

  • डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करावा.

  • तयार होणाऱ्या कायद्यात हिंसाचार हा भारतीय दंड संहितेच्या कक्षेत आणावा.

  • वैद्यकीय आस्थापना संरक्षित क्षेत्र घोषित करावे.

  • रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करावे

  • हल्लेखोरांवरील खटल्यांसाठी जलद न्यायालयात चालवावे

१८ जून रोजी निषेध दिन; खासगी डॉक्टर नोंदवणार हल्ल्यांचा निषेध
चमत्काराची प्रतीक्षा! आजारी निकिताचा मुलीत अडकला जीव

रामदेवबाबा अशिक्षित

कोरोना काळात जिवाची बाजी लावणारे डॉक्टर आणि अ‍ॅलोपॅथीबाबत योगगुरू रामदेवबाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. रामदेवबाबा यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला. रामदेवाबाबांचा देशभर ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्या संघटनेने निषेध केला. मात्र, यावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव यांनी रामदेवबाबा अशिक्षित असून त्याच्या बोलण्याला कोणीच महत्त्व देऊ नये असे मत व्यक्त केले. रामदेवबाबाला यापूर्वी नागपुरातून कॅन्सर रुग्ण बरे करण्यासाठी आव्हान दिले होते, अद्याप त्यांनी ते आव्हान पूर्ण केले नाही. केवळ आपली चूक कबूल केली. यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी चुकीचे विधाने करतो, असेही ते म्हणाले.

(Private-doctors-to-register-protest-on-June-18)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com