esakal | आनंदवार्ता! रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मिळणार संत्रा अन् शेतकऱ्यांना हक्काची जागा...
sakal

बोलून बातमी शोधा

At railway stations, passengers will get orange and farmers will get their rightful place

नागपूर शहर संत्रानागरी म्हणून ओळखले जाते. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संत्र्याचे आकर्षण स्वाभाविक आहे.

आनंदवार्ता! रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मिळणार संत्रा अन् शेतकऱ्यांना हक्काची जागा...

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नागपूरसह विभागातील रेल्वे स्थानकावर संत्रा विक्रीसाठी हक्काची जागा मिळणार आहे. खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून या विषयाचा पाठपुरावा सुरू होता. आज मध्य रेल्वेतर्फे आयोजित याच विषयावर त्यांनी पुन्हा भर दिला. त्याची तत्काळ दखल घेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जागा देण्याचे मान्य केले. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!  

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी गुरुवारी खासदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधत सुधारणा व प्रवासी सुविधांसंदर्भात त्यांची मते जाणून घेतला. संसदेच्या परिवहन समितीवर असलेले तुमाने यांनी रामटेक मतदार संघातील मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांशी संबंधित विविध समस्या मांडल्या. विदर्भातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन रेल्वेने सुरू केलेली किसान स्पेशल गाडी नागपूरमार्गे चालविण्याची सूचना केली.

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

नागपूर स्थानकावरून थेट दिल्लीसाठी रेल्वेगाडी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते, यामुळे दिल्लीसह हावडा व गोरखपूर स्थानकापर्यंत नागपूरहून रेल्वे सुरू करण्याची मागणी लावून धरली. नागपूर-सेवाग्राम तिसऱ्या व चौथ्या लाइनसाठी जमीन अधिग्रहण संदर्भात येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्यात याव्या, राज्यातील पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र असलेल्या बुटीबोरी येथे देशभरातून येणाऱ्या कामगारांच्या सोईसाठी बुटीबोरी स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा, कळमेश्वरसह काटोल व नरखेड व मोवाड येथेही सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा, कळमेश्वर एमआयडीसी तील कंपन्यांना त्यांच्या मालासाठी रेल्वेची जोड मिळावी यासाठी रेल्वे सायडिंगचे काम करावे अशा सूचना केली. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

नागपूर शहर संत्रानागरी म्हणून ओळखले जाते. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संत्र्याचे आकर्षण स्वाभाविक आहे. आता रेल्वे स्थानकावर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध होणार असल्याने प्रवासी व शेतकरी या दोन्ही घटकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक तर खास चवीसाठी प्रसिद्ध असलेली नागपुरी संत्री थेट शेतातून स्थानकावर पोचतील यामुळे प्रवाशांना संत्र्याचा गोडवा वेळेत चाखता येईल, असा विश्वास खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला. 

सूचनांचा पाऊस 
या बैठकीत खासदार डॉ. विकास महात्मे, रामदास तडस, दुर्गादास उईके, सुरेश धनोरकर आदींनी सहभागी होत सूचना मांडल्या. महाव्यवस्थापकांनी खासदारांच्या सल्ल्यानुरूप कामे करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत प्रिन्सिपल मुख्य परिचाल व्यवस्थापक डी. के. सिंह, प्रिन्सिपल मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मनजित सिंग, मुख्य प्रशासनिक अधिकारी (निर्माण) मनोज शर्मा, प्रधान मुख्य अभियंता अश्विनी सक्सेना, उपमहाव्यवस्थापक दिनेश वशिष्ठ, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी, जय सिंह, अनपकुमार सतपथी उपस्थित होते. 

(संपादन : प्रशांत राॅय)

loading image
go to top