esakal | पावसाचा लहरीपणा कायम; नागरिक हैराण, शेतकरी चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा लहरीपणा कायम; नागरिक हैराण, शेतकरी चिंतेत

पावसाचा लहरीपणा कायम; नागरिक हैराण, शेतकरी चिंतेत

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचा लहरीपणा कायम आहे. यंदा अगदी वेळेत दाखल झालेला मॉन्सून बघता पाऊस सलगीने वागेल अशीच अपेक्षा वर्तविली जात होती. प्रारंभी धो-धो पावसाची मुसळधार सर्वांना सुखावून गेली. परंतु, त्यानंतर बेपत्ता झालेल्या पावसाने अधेमधे हजेरी लावण्या व्यतिरिक्त दुसरे काही केले नाही. अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण आहे. तिकडे जमिनीत बियाणे पेरल्यानंतर पावसाच्या आशेने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. (Rain-News-Farmers-worried-The-need-for-rain-nad86)

ऐरवी १५ जूनपर्यंत दाखल होणारा मॉन्सून यावर्षी १२ जूनलाच दाखल झाला. वेळेपूर्वीच पावसाची उपस्थिती पाहून बळीराजा सुखावला. कोरोनाशी दोनहात केल्यानंतर पुन्हा शेतीकामाला लागलेल्या शेतकऱ्यांना पाऊस सुखावून गेला. शेतीची पेरणीपूर्व तयारी आटोपती झाली आणि प्रत्यक्षात पेरणी झाल्यानंतर रोपट्यांनी जमिनीबाहेर तोंडही काढले.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

शेतावर रोपट्यांची हिरवळपाहून पावसाच्या सलगीपणाणे वागण्याच्या अपेक्षा वाढल्या. हवामान खात्याकडून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत होता, त्यावरून यंदा पीक चांगले येण्याची अपेक्षा वाढली. परंतु, पावसाने लहरीपणा दाखवला आणि हिरमोड झाला. पाऊस दडी मारून बसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट वाढू लागले.

अशातच ८ जुलै रोजी विदर्भासह नागपुरात चांगला मुसळधार पाऊस झाला. नागपूर शहराची अक्षरशः: दाणादाण उडाली. पावसाची मुसळधार बघता हवामान खात्याने असाच पाऊस पुढील काही दिवस असेल असे सांगितले. परंतु, ८ जुलैपासून बेपत्ता झालेला पाऊस अद्यापही बेपत्ताच आहे. अशातच शहरात उष्मा वाढल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

वातावरणात ऊन-सावलीचा खेळ असून आकाश ढगाळ आहे. तसे असले तरी पावसाचा कुठेही ठाव ठिकाणा नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या दिवसात अल्प पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली. १९ जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची स्थिती असून, २० जुलैला मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत पावसाचे आगमन झाले नाही.

मध्य महाराष्ट्र व शेजारील राज्यांत सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. २१ जुलैपर्यंत बंगालचा उपसागर व शेजारी हवेचा दबाव वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर वातावरण बदलण्याचा अंदाज आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, अमरावती, गडचिरोली व चंद्रपूर जिल्हातही काही ठिकाणी हलका पाऊस होईल. वर्धा, अकोला, यवतमाळ व वाशिम भागात चांगला पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. २० जुलैपर्यंत सर्व जिल्ह्यांत सर्वव्यापी व चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

(Rain-News-Farmers-worried-The-need-for-rain-nad86)

loading image