योग्यता नसलेले सत्तेत, चांगले लोक राजकारणापासून दूर राहणं ही चूक; RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?

Ramnath Kovind RSS Nagpur Speech : नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. यावेळी भाषणात रामनाथ कोविंद यांनी आरएसएसचं कौतुक केलं.
Ramnath Kovind Speech at RSS Vijayadashami Nagpur Highlights Role of Good Citizens in Politics

Ramnath Kovind Speech at RSS Vijayadashami Nagpur Highlights Role of Good Citizens in Politics

Esakal

Updated on

देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील दसरा मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आहेत. रेशीमबागेतील विजयादशमी दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या १०० वर्षांची वाटचाल आणि समाजाच्या कार्याचं कौतुक केलं. तसंच आजच्या तरुणांनी राजकारणात यायला हवं, आज तुम्ही जे काही आहात ते समाज आणि देशामुळे. आता ते ऋण फेडण्याची गरज असल्याचं मत रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com