esakal | पुस्तकांना 'आवाज' देण्याची संधी, ऑडिओ बुक्सची वाचकांना गोडी
sakal

बोलून बातमी शोधा

audio books

पुस्तकांना 'आवाज' देण्याची संधी, ऑडिओ बुक्सची वाचकांना गोडी

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : आजवर आपण कार्टुन्सला, चित्रपटातील पात्राला, जाहिरातीला आवाज देण्याबाबत ऐकले होते. आता आवाजाच्या क्षेत्रामध्ये नवे काही करू पाहणाऱ्यांसाठी एका नव्या क्षेत्राची भर पडली आहे. ते म्हणजे पुस्तकांना ऑडिओ रूपात सादर (audio books) करणे. लॉकडाउनच्या (lockdown) काळात नावाजलेल्या कलावंतांनी आपल्या आवाजात लाडक्या लेखकांच्या पुस्तकांना आवाज दिला. गो. नी. दांडेकर, पु. ल. देशपांडे, जयंत दळवी, रत्नाकर मतकरी अशा सर्व थोर साहित्यिकांचे संपूर्ण साहित्य या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. (readers more like audio books from lockdown)

हेही वाचा: ZP पोटनिवडणूक : १६ पैकी १२ उमेदवार निश्चित, चार जागांसाठी रस्सीखेच

एरवी चित्रपट आणि मालिकांमधील पात्राला खुलविणारे आपले लाडके कलावंत लॉकडाउनमध्ये ‘ऑडिओ बुक्स’ला आवाज देण्यात मग्न होते. विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, अनुपम खेर, मुक्ता बर्वे, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी (सिनिअर), प्रकाश राज अशा एका पेक्षा एक वरचढ अभिनेत्यांनी या काळात ऑडिओ बुक्सला आपला रसाळ आवाज देत कथा खुलविल्या.

श्रोत्यांमध्ये तरुण अग्रस्थानी -

‘नव्या पिढीला वाचनामध्ये रस नाही’ असा काहीसा आरोप जुन्या पिढीतील वाचनप्रेमींकडून होतो. मात्र, साहित्याला तंत्रज्ञानाची जोड असल्यामुळे युवक, नव्या साहित्य वर्गाला खेचण्यात हा प्रकार यशस्वी झालाय. दिवसाला अडीच ते तीन हजार साहित्यप्रेमी या प्रकारातील अप्लिकेशनचे सभासदत्व स्वीकारत आहेत. यामध्ये, प्रामुख्याने १८ ते ४५ या वयोगटांतील साहित्य प्रेमींचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

आवाज देण्याला इच्छुक असलेले पाच मिनिटाच्या वाचनाची ऑडिओ क्लीप आमच्याकडे पाठवितात. ही क्लीप आमच्या ऑडिओ बँकेत ठेवण्यात येते. पुस्तकाचे कथानक, त्यातील बोली भाषा, कथानकातील प्रदेशानुसार योग्य आवाजाची निवड केल्या जाते. www.storytel.com वेबसाइटच्या माध्यमातून इच्छुक आवाज पाठविण्यासाठी संपर्क साधू शकतील.
-प्रसाद मिरासदार, प्रकाशक, स्टोरीटेल.
बोली भाषेतील ऑडिओला जास्त पसंती मिळते. वाचिक अभिनयाचा वापर करून ही पुस्तके आपण स्वत: रेकॉर्ड करू शकतो. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशी पुस्तक अपलोड केल्यास उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होईल.
-अक्षय राऊत, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट

उपलब्ध ‘ऑडिओ’ साहित्य

  • बाल साहित्य, प्रवास वर्णन, नावाजलेल्या कादंबऱ्या, रहस्यकथा, चरित्र, कविता, श्रृंगार, थ्रिलर प्रकारांमध्ये ऑडिओ बुक्स उपलब्ध

  • कथानकाच्या मराठी, इंग्रजीसह ११ भारतीय भाषा

  • एक लाखांपेक्षा जास्त पुस्तके मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून ऑडिओ रूपात

  • दररोज अडीच ते तीन हजार सभासद

loading image
go to top