नागपूर : कोरोनाग्रस्त वाढताच गृहविलगीकरण सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
नागपूर : कोरोनाग्रस्त वाढताच गृहविलगीकरण सुरू

नागपूर : कोरोनाग्रस्त वाढताच गृहविलगीकरण सुरू

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट(Corona Third Wave) सुरू झाल्याची राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. दररोज बाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाने विलगीकरणाचा पर्याय खुला ठेवला आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल ९७२ नागरिकांना कोरोना झाला असून सध्या जिल्‍ह्यात ४ हजार १५८ सक्रिय कोरोनाबाधित आहेत.दुसरी लाट संपल्यानंतर प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला होता. मात्र, आता गृहविलगीकरणाचा पर्याय खुला केल्याने संक्रमणाचा वेग वाढल्याची चर्चा आहे. दर दिवसाला संख्या वाढत असल्यानेच अवघ्या १० दिवसात ४ हजार ५१२ बाधितांची नोंद झाली.

हेही वाचा: कित्तुर येथील निवासी गृहातील 80 विद्यार्थ्यांनीना कोरोनाची लागण

जिल्ह्यात कोरोना(Corona) विषाणूंच्या डेल्टा(delta) आणि ओमिक्रॉन (Omicron)या दोन्ही व्हेरियंटचा उद्रेक वाढत आहे. एकाच दिवशी १ हजारापर्यंत नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. ही दैनंदिन रुग्णसंख्या सापडणे धोक्याचे आहे. विशेष असे की, प्रशासनाने दुसरी लाट ओसरताच गृहविलगीकरण बंद केले होते. संस्थात्मक विलगीकरणाची सक्ती केली होती.मात्र रुग्णांची संख्या वाढत असताना स्थानिक प्रशासनाने पुन्हा गृहविलगीकरणाचा पर्याय खुला केला.

हेही वाचा: वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप

२ हजार १९२ कोरोनाबाधित गृहविलगीकरणात आहेत. यामुळे लक्षणे नसलेल्या गृहविलगीकरणातील कोरोनाबाधितच संक्रमणाचे वाहक बनत असल्याची चर्चा मेडिकल वर्तुळात आहे. सोमवारी (ता. १०) जिल्ह्यात ९ हजार ८५२ चाचण्या झाल्या. यात शहरात ८ हजार ७१७ व ग्रामीणमध्ये १ हजार १३५ चाचण्यांचा समावेश आहे. यात ९७१ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले. शहरातील ७९२, ग्रामीणमधील ११७ व जिल्ह्याबाहेरील ६२ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ९८ हजार ५५९ वर गेली आहे.

१५८ जणांची कोरोनावर मात

दिवसभरात शहरातून १०७, ग्रामीणमधून ८ तर जिल्ह्याबाहेरील ४३ असे १५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे दिवसभरात एकाच्याही मृत्यूची नोंद झाली नसली तरी दैनंदिन बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. दैनंदिन बाधितांची संख्या वाढत असल्याने सक्रिय कोरोनबाधितांचा आकडा फुगला आहे. जिल्ह्यात ४ हजार १५८ सक्रिय कोरोनाबाधित आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top