
नागपूर : विदर्भ राज्य निर्मितीची १२० वर्षांपासूनची मागणी कायमची निकाली काढावी. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी. विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव अधिवेशनात सर्व प्रतिनिधींच्या संमतीने पारित करण्यात आला. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना या ठरावाबाबत पत्र पाठविण्यात येणार असल्याचे अधिवेशनात जाहीर करण्यात आले.