esakal | मध्यरात्री नातेवाईक फोने करून म्हणाले, बाळाने जन्मताच सांगितले हाता-पायाला हळद लावल्याने होणार नाही कोरोना!

बोलून बातमी शोधा

Rumors on Corona in rural areas of Nagpur district

इतक्‍या रात्री फोन आल्याने अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली होती. मात्र, या बातमीवर विश्‍वास करावा की नाही, असाच प्रश्‍न त्यांच्या मनात उपस्थित होत होता. कारण, नुकत्याच जन्मलेल्या बाळाने ही बाब सांगितली असून, त्याचा मृत्यू झाल्याचे एकाने सांगितले.

मध्यरात्री नातेवाईक फोने करून म्हणाले, बाळाने जन्मताच सांगितले हाता-पायाला हळद लावल्याने होणार नाही कोरोना!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामटेक (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुका... तालुक्‍यातील शिवनी भो. गाव व आजूबाजूचा परिसर... गावात कोरोनाचीच चर्चा... मध्यरात्री एकाचा फोन खणखणतो... नुकत्याच जन्मलेल्या बाळाने सूर्योदय होण्यापूर्वी उजव्या हाता-पायाला मिठ मिश्रित हळत लावण्यात सांगितले... यामुळे कोरोना होणार नाही असे तो म्हणाला आणि मरण पावल्याचे सांगितले. यानंतर मध्यरात्री अनेकांचे फोन खणखणाला लागले... एका अफवेने नागरिकांची रात्र जागण्यातच गेली... 

सध्या जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चिनमधून आलेल्या व्हायरसने जगालादे आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना व्हायरसचे सर्वाधिक बळी इटलीत झाले आहेत. भारतातही कोरोना शिरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन लागू केले आहे. यामुळे सर्वांना घरातच राहावे लागत आहे. कोरोना व्हायरची भीती सर्वांना वाटत आहे. याची लागण आपल्याला होऊ नये म्हणून सर्वजण खबरदारीचे सर्व प्रयत्न करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागात अफवांनाही पेव फुटले आहेत. 

अधिक वाचा - लॉकडाउनमुळे माहेरीच अडकली विवाहिता, प्रियकराने हितगुज साधण्याचा प्रयत्न केला अन्‌ कुटुंबीयांनी केले असे...

रविवार (ता. 29) नेहमीप्रमाणे उजळला. लॉकडाऊन असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील एका गावात वातावरण सामन्यच होते. दिवस घरातच गेला. रात्र झाल्याने गाव झोपी गेले होते. अशात मध्यरात्री तीन ते चारच्या सुमारास कुणीतरी नातेवाईकाला फोन करून उजव्या हाता-पायला मिळ मिश्रित हळद लावल्याने कोरोना व्हायरसची लागण होत नाही, अशी माहिती दिली. 

इतक्‍या रात्री फोन आल्याने अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली होती. मात्र, या बातमीवर विश्‍वास करावा की नाही, असाच प्रश्‍न त्यांच्या मनात उपस्थित होत होता. कारण, नुकत्याच जन्मलेल्या बाळाने ही बाब सांगितली असून, त्याचा मृत्यू झाल्याचे एकाने सांगितले. यामुळे काय करावे, असाच प्रश्‍न पडला होता. तरीही अनेकांनी मध्यरात्री एकमेकांना फोन करून याची माहिती देण्यास सुरुवात केली. एकवीसाव्या शतकातही लोक अंधश्रद्धेवर विश्‍वास ठेवत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. 

एकमेकांना मॅसेच पाठवू नका 
पायाला हळद किंवा तेल लावल्याने कोरोना होत नाही, अशी अफवा ग्रामीण भागात सध्या जोर धरीत आहे. याला कुठल्याही वैद्यकीय चिकित्सकाने मान्य केले नाही. ही सर्व अफवा आहे. नागरिकांनी अशा अफवांवर लक्ष देऊ नये. सोशल मीडियावरून एकमेकांना पाठवू नये. आजार वाटत असल्यास त्वरित नजिकच्या शासकीय रुग्णालयमध्ये तपासणी करावी. 
- राम वाडीभस्मे, 
सोशल मीडिया कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूर जिल्हा

जाणून घ्या - तू मला आवडली, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव म्हणत करायचा हा प्रकार...

अंधश्रद्धेला बळी पडू नका 
अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. घरातच राहा आणि जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या. 
- डॉ. चेतन नाईकवार, 
तालुका वैद्यकीय अधिकारी, रामटेक