संघर्ष! राष्ट्रीय मॅरेथॉनपटू प्राची गोडबोलेची जिद्दीने स्वप्नाकडे वाटचाल

संघर्ष! राष्ट्रीय मॅरेथॉनपटू प्राची गोडबोलेची जिद्दीने स्वप्नाकडे वाटचाल

नागपूर : एखाद्या खेळाडूला आयुष्यात उंच झेप घेण्यासाठी पैसा व सोयीसुविधांची तर गरज असतेच. परंतु, त्याचवेळी त्याच्यात जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती आणि समर्पणवृत्ती हे गुणही असावे लागते. शहरातील प्रतिभावान धावपटू प्राची गोडबोले (Runner Prachi Godbole) हिच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. हलाखीची परिस्थिती असूनही प्राचीने जिद्दीने मैदान गाजवून ॲथलेटिक्समध्ये वेगळी ओळख (Different identities in athletics) निर्माण केली आहे. तिचा हा संघर्ष परिस्थितीचे नाहक भांडवल करणाऱ्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी (Runner Prachi Godbole's journey is inspiring) उदाहरण आहे. (Prachi-Godbole-from-Nagpur-made-a-name-for-himself-in-athletics)

रेशीमबागमध्ये दहा बाय दहाच्या किचन कम बेडरूममध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय प्राचीच्या संघर्षाची कहाणी जेवढी वेदनादायी तितकीच विचार करण्यास भाग पाडणारी आहे. केवळ दहा वर्षांची असताना कपडे प्रेसचा व्यवसाय करणारे तिचे वडील (राजू गोडबोले) सोडून गेले. त्यामुळे परिवाराची जबाबदारी आई शशीवर येऊन पडली. उदरनिर्वाहासाठी नाइलाजाने तिच्या आईला साफसफाईचे (हाऊसकिपिंग) काम करावे लागत आहे. दिवसभर घाम गाळूनही हाती जेमतेम पाच-हजार रुपये पडतात.

एवढ्याशा कमाईत संसाराचा गाडा चालविणे कठीण झाल्याने तिचा थोरला भाऊ राकेशला शिक्षण अर्धवट सोडून मोबाईल शॉपमध्ये नोकरी करावी लागली. कोरोनामुळे आता तोसुद्धा घरीच बसला आहे. परिस्थितीचे चटके बसत असतानाही गोडबोले परिवार हिंमत हारला नाही. प्राचीची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिला सतत प्रोत्साहन दिली. कधीही वडिलांची कमतरता भासू दिली नाही. आर्थिक चणचण असूनही तिने प्राचीचे क्रीडाप्रेम जपले. प्राचीनेही गरिबीशी दोन हात करीत राष्ट्रीय स्तरावर ॲथलेटिक्समध्ये नाव कमावून आईच्या कष्टाचे चीज केले.

संघर्ष! राष्ट्रीय मॅरेथॉनपटू प्राची गोडबोलेची जिद्दीने स्वप्नाकडे वाटचाल
फोटोंमध्ये बघा रामटेकमधील गडमंदिराचे सौंदर्य

मॅरेथॉन धावपटू असलेल्या प्राचीने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रॉसकंट्री व मॅरेथॉन स्पर्धांमध्ये अनेक मेडल्स व मानसन्मान मिळविले आहेत. सद्यःस्थितीत भारतातील पहिल्या तीन मॅरेथॉनपटूंमध्ये समावेश असलेल्या प्राचीने तीन महिन्यांपूर्वी दिल्ली मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक जिंकले होते. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे नागपूरचे क्रीडा विश्व तिच्याकडे भविष्यातील स्टार धावपटू म्हणून पाहत आहे. डॉ. एम. के. उमाठे कॉलेजमध्ये बी. ए. अंतिम वर्षाला असलेली प्राची गेल्या पाच वर्षांपासून ट्रॅकस्टार क्लबचे प्रशिक्षक रवींद्र टोंग यांच्या मार्गदर्शनात सराव करीत आहे.

टोंग यांच्याकडे आल्यापासून प्राचीची कामगिरी आणखीनच बहरली आहे. प्राचीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असून, मॅरेथॉनमध्ये आशियाई ‘चॅम्पियन’ व्हायचे आहे. तसेच उदरनिर्वाहासाठी ‘स्पोर्ट्स कोट्या’तून नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे. प्राचीमधील टॅलेंट लक्षात घेता ती नक्कीच आपले स्वप्न पूर्ण करेल, यात अजिबात दुमत नाही.

संघर्ष! राष्ट्रीय मॅरेथॉनपटू प्राची गोडबोलेची जिद्दीने स्वप्नाकडे वाटचाल
...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा

गुरूचे आर्थिक पाठबळ

प्राचीच्या यशात तिच्या मेहनतीशिवाय गुरू रवींद्र टोंग यांचेही खूप योगदान आहे. प्राचीची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने ते तिच्याकडून प्रशिक्षण शुल्क घेत नाही. उलट तिला डायट, शैक्षणिक शुल्क व इतर आवश्यक गोष्टींसाठी स्वतःच्या खिशातून सढळ हाताने मदत करीत असतात. ग्रामीण पोलिसामध्ये कार्यरत असलेले टोंग हे स्वतः राष्ट्रीय धावपटू राहिले आहे. त्यामुळे त्यांना खेळाडूंच्या परिस्थितीची जाणीव आहे. आपल्या शिष्याने उंच झेप घेऊन देशाचे नाव करावे, हीच यामागची भावना असल्याचे ते म्हणाले.

आतापर्यंत बऱ्यापैकी कामगिरी केली असली तरी, त्यावर पूर्णपणे समाधानी नाही. मला राष्ट्रीय स्तरावर आणखी चांगले प्रदर्शन करायचे आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. स्वप्नपूर्तीसाठी कठोर परिश्रम करण्याची माझी तयारी आहे.
- प्राची गोडबोले, राष्ट्रीय मॅरेथॉनपटू

(Prachi-Godbole-from-Nagpur-made-a-name-for-himself-in-athletics)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com