नागपूर : दो दिन गाडी घुमाके पैसे इकठ्ठा किए साब;जखरा रबारीची खंत

जखरा रबारीची खंत, उंट सोडविण्यासाठी भरावे लागले तब्बल चार लाख रुपये
camel Rescue
camel Rescuesakal

नागपूर : ‘‘दो दिन वर्धा जिल्हे में हमारी गाडी घुमी. किसी परिवार ने पांच सौ रुपये दिए. किसीने हजार तो किसीने दो हजार. जिसका उॅंट नही पकडा, उसने भी पैसे दिए. तीन लाख ९४ हजार रुपये गोशाला के अकाउंट में डाल दिए. अब वकील गये है ठाणे में. हम इथर खाना पका रहे है. रात को बारा बजे भी उॅंट मिल गए तो रात में ही यहा से निकल जाएंगे.’’ जखरा रबारी यांनी माहिती दिली.

camel Rescue
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांनी मानले PM मोदींचे आभार

उंटांच्या तस्करीचा आरोप हैदराबादच्या एका कार्यकर्त्याने धामणगाव रेल्वे तालुक्यातील पोलिस स्टेशनमध्ये दाखल केल्याने ५८ उंट आणि पाच उंटवाहक रबारींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रबारी वाहकांची मुक्तता दोन-तीन दिवसांतच झाली. उंटांची रवानगी अमरावतीच्या गोशाळेत केली गेली.

तस्करी नसून विकत घेतलेले उंट असल्याचे न्यायालयात सिद्ध केल्यावर उंटांची सुटका करण्याची ऑर्डर कोर्टाने काढली. पोलिस स्टेशनला आवश्यक प्रक्रिया पार पाडली. परंतु उंटांना सोडविण्यासाठी पैसे भरावे लागणार, हे माहिती झाले तेव्हापासून साजन रबारी, जखरा रबारी आणि सर्व रबारी बांधव कामाला लागले. वर्धा जिल्ह्यात सध्या दीडशेहून जास्त परिवार आहेत. त्यांच्यापैकी जवळपास सर्वच कुटुंबांनी आपले योगदान म्हणून जमेल तेवढे पैसे दिले. नागपूर, छत्तीसगडहून लोक जमा केलेले पैसे घेऊन आले. ते इथे एकाच्या अकाउंटमध्ये टाकण्यात आले. गोशाळेवाले म्हणाले, ‘‘आम्हाला हाती पैसा नको, अकाउंटमध्ये टाका.’’ म्हणून मग पैसे बॅंक ट्रान्सफर करण्यात आले.

camel Rescue
लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारी संतापजनक; दिल्ली उच्च न्यायालयाची नाराजी

जखरा म्हणाले, ‘‘भैया बहुत बुरी पोझिशन हो गई हमारी. घुम-घुमके पैसा इकठ्ठा किया. हम गरीब के पास कहाॅं से इतने पैसे. पह्यले चार लाख सात हजार रुपये डालने के लिए बोला. बाद में कम कर दिए.’’ याबाबत पशुअभ्यासक सजल कुलकर्णी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारचा आदेशच आहे. त्यामुळे खावटीचे पैसे भरावे लागणारच. अशा प्रकरणात काय करावे, याबाबत स्पष्ट निर्देश नाहीत. परंतु या मुद्यावर सरकारसोबत पुढे चर्चा करण्यात येईल.’’

नेहमी भटकंतीची सवय असलेले उंट एकाच ठिकाणी ठेवल्याने अशक्त होण्याची शक्यता आहे. त्यांना तूप आणि आंबेहळद खाऊ घातल्यानंतरच पुढील प्रवास सुरू करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

-सजल कुलकर्णी, पशुअभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com