वनमंत्री म्हणाले, बाळासाहेब ठाकरे गोरेवाड्या उद्यानात ‘गोंडवाना थीम पार्क’ बनविणार; नामकरणाचा वाद दुर्दैवी

sanjay rathod says Balasaheb Thackeray will build Gondwana theme park in Gorewada garden
sanjay rathod says Balasaheb Thackeray will build Gondwana theme park in Gorewada garden

नागपूर : येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाचे नामकरण करण्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उद्यानाचे नाव गोंडवाना उद्यान करावे, अशी आदिवासी बांधवांची मागणी होती, असे चित्र निर्माण करून दिशाभूल करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला जात आहे. या उद्यानात आणखी  सफारी, नाईट सफारी, जैवविविधता उद्यान हे उपक्रम आहेत.

भविष्यात या उद्यानामध्ये आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, जीवनमान याबाबत सर्वसमावेशक असे 'गोंडवाना थीम पार्क' करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी या उद्यानाच्या नामकरणावरून होत असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना दिली.

उद्यानास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यावरून  दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे दुर्दैवी आहे असे वनमंत्री राठोड म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे स्वत: पर्यावरणप्रेमी व वन्यजीव प्रेमी होते. एवढेच नव्हेतर सर्व ठाकरे कुटुंबीय हे पर्यावरणप्रेमी व आदवासी समाजाचे हितच पाहणारे आहेत.

दहा वर्षांपासून हे पार्क बनवण्याच्या घोषणा होत गेल्या. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही, ही वस्तूस्थिती आहे. याला गोंडवाना नाव देण्याचा कुठेही प्रस्ताव शासनाकडे नव्हता. खरेच हा प्रस्ताव होता तर मग तेव्हाच नाव का दिले नाही, याचे उत्तर विरोधकांना देता येणार नाही. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला प्रत्यक्ष विरोध करण्याची हिंमत नसल्याने आदिवासी समाजाचा वापर करून अप्रत्यक्ष विरोध करू नका, असे आवाहनही वनमंत्री राठोड यांनी केले आहे. दोन हजार हेक्टरवर पसरलेले भारतातील सर्वात मोठे प्राणी उद्यान असणार आहे. आता फक्त त्यातील भारतीय प्राणी सफारीचे उद्घाटन होत आहे. एकूण क्षेत्रफळाच्या हा केवळ २० टक्के भाग आहे.

भविष्यात येथे गोंडवाना थीम पार्क उभारण्याचा मानस आहे. याकरिता झारखंड, छत्तीसगडमधील आदिवासी थीम पार्कचा अभ्यास करून त्यापेक्षा सरस आणि सुसज्य असे गोंडवाना पार्क या उद्यानाअंतर्गत निर्माण करण्यात येईल, असे वनमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com