esakal | नागपुरात निर्बंध झुगारले; अत्यावश्यक सेवेत नसलेली 'दुकाने विकेंड'लाही सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

नागपुरात अत्यावश्यक सेवेत नसलेली 'दुकाने विकेंड'लाही सुरू

अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने विकेंडलाही सुरू करून दुकानदारांनी आता प्रशासनालाच आव्हान दिले आहे.

नागपुरात अत्यावश्यक सेवेत नसलेली 'दुकाने विकेंड'लाही सुरू

sakal_logo
By
- राजेश प्रायकर

नागपूर: गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन, निर्बंधामुळे डबघाईस आलेला व्यवसाय वाचविण्याची कसरत सर्वच दुकानदार करीत आहेत. त्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा डेल्टा प्लसच्या भीतीने अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवार, रविवार बंद करण्याच्या आदेशामुळे दुकानदारांचा संयम आता ढासळत असल्याचे महापालिकेने केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने विकेंडलाही सुरू करून दुकानदारांनी आता प्रशासनालाच आव्हान दिले आहे.

हेही वाचा: दहावीचा निकाल : अमरावती विभाग ९९.९८ तर नागपूर ९९.८४ टक्के

कोरोनाच्या वर्गवारीतील डेल्टा प्लस स्वरूपाच्या विषाणूमुळे राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर केले. त्यामुळे महापालिकेने २८ जूनपासून सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील तसेच अत्यावश्यक सेवेत समावेश नसलेली दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील असे आदेश काढले. त्यापूर्वी १८ जूनला सर्व दुकाने रात्री आठवाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे दुकानदारांत उत्साह होता. परंतु दहा दिवसांनी २८ जूनपासून अत्यावश्यक नसलेली दुकाने शनिवार, रविवारी बंदचे आदेश काढण्यात आले. मुळात शनिवार, रविवार चाकरमान्यांना सुट्टी असल्याने व्यवसायाच्या दृष्टीने ही दोनच दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. परंतु त्यांची गेल्या काही दिवसांपासून निराशा झाली. आता निराशेचे रुपांतर संतापात होत असून दुकानदारांनी शनिवारीही दुकाने सुरू केली होती.

हेही वाचा: खुशखबर! नागपूर विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शनिवारी रामेश्वरी येथील श्री कलेक्शन, उमरेड रोडवरील माऊली मोटर्स, गांधीबाग येथील बॉम्बे एनएक्स, सीए रोडवरील रॉयल इलेक्ट्रिकल्स, जलालपुरा येथील महावीर कमर्शिअल शॉप्स, सदर येथील मास्टर रेस्टॉरंटवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान या दुकानदारांनी संताप व्यक्त केला. या दुकानदारांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकीकडे डबघाईस आलेला व्यवसाय वाचविण्याची कसरत सुरू असताना दंडात्मक कारवाईमुळे रोषात भर पडत आहे. शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना आटोक्यात आहे. बळीसंख्याही शून्य असून बाधितांची संख्याही १०-१२ पर्यंत आहे. त्यामुळे विकेंडलाही दुकाने सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा: मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला घेतलं कामावर; नागपूर मनपाचा कारभार

अत्यावश्यक सेवेतील दुकानावरही कारवाई

किराणा दुकान अत्यावश्यक सेवेत आहे. चार वाजेपर्यंत ही दुकाने सुरू करण्याची परवानगी आहे. परंतु शनिवारी, उपद्रव शोध पथकाने मस्कासाथ येथील कन्हैय्या किराणा स्टोअर्सवरही कारवाई केली. कोरोना नियमाचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. परंतु प्रत्येकाचे किराणा दुकानात काही ग्राहक असतात, त्यावर कारवाई म्हणजे व्यावसायिकांचे कंबरडे मोडणेच असल्याचे दुकानदाराने नमूद केले.

loading image