Video : साहेबऽऽ, लोक पैसे देतात अन्‌ पूर्ण शरीराशी खेळतात, आज मात्र... 

silence in Ganga Jamuna today because of lockdown
silence in Ganga Jamuna today because of lockdown

नागपूर :  साहेब... मी एक वारांगणा... दोन पैशांसाठी आपले शरीर विकते... लोकही पैसे देऊन वाट्टेल ते करतात... पूर्ण शरीराशी खेळतात हो... पण काय करणार... पोटाची आग ऐवढी पेटते की शरीर विकावच लागते... शरीर विकल नाही आणि ग्राहकाला आनंद दिला नाही तर पोटाची आग शांत झोपू देत नाही... मी माझ शरीर इच्छेने नाही तर परिस्थितीमुळे विकते... यामुळे मले दोन पैसे मिळले अन्‌ ग्राहकाची इच्छाही पूर्ण होते. मात्र, ही कोनती बिमारी आली "कोरोना'... आम्हाला काहीही करू देईना... लॉकडाउन झाल्याने आमचा धंदाच बंद पडला आहे... आता तर खाचेही वांदे झाले साहेब... काय कराव काही समजे ना... 

नागपूर शहरातील बदनाम वस्ती म्हणजे गंगाजमुना... या वस्तीत चोवीस तास रौनक असते.... त्यामुळे "ये चिकने... बैठना हैं क्‍या' असे अश्‍लील शब्द कानी येतात... या वस्तीत तरुणाईचा मोठा गोतावळा असतो. तरुण पैसे खर्च करून आपली "सेक्‍स'ची इच्छा पूर्ण करतात. येथील महिला व मुली थोड्यास्या पैशांसाठी आपले शरीर विकतात. मात्र, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे गंगाजमुना वस्तीत भयाण शांतता आहे. येथील जवळपास तीन हजार वारांगणांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही समाजिक संस्थांनी वारांगणांसाठी दोन वेळेसच्या जेवनाची व्यवस्था केली असली तरी अजून तेथील परिस्थिती मार्गावर आलेली नाही.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे शहरातील सर्वच व्यापार-व्यवसाय बंद पडले. कोरोना प्रादुर्भाव आणि फैलाव रोकण्यासाठी सोशल डिस्टन्सिग ही उपाययोजना प्रशासनाने पाळण्याची सक्‍ती केली. अचानक उद्‌भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गंजाजमुनातील जवळपास आठ हजार युवती व महिलांच्या उपजिवकेवर परिणाम पडला. काही युवतींनी लॉकडाएन होण्यापूर्वीच आपापले राज्य गाठले तर काहींना नाईलाजाने गंगाजमुना वस्तीत बस्तान मांडावे लागले. 

देहविक्रीतून पैसा कमविणे आणि उदरनिर्वाह करणे हाच दिनक्रम असलेल्या जवळपास तीन हजार वारंगाणांसमोर जीवन-मरण्याचा प्रश्‍न उभा राहिला. त्यातही पोलिसांच्या त्रासापायी दोन पैसे गोळा करणे कठीण झाले होते. अशा स्थितीत गजबजलेल्या गंगाजमुना वस्तीतील ग्राहकांची संख्या अचानक शून्यावर आल्यामुळे अस्तित्वाची लढाई वारंगणा लढत आहेत. 

अशात मोहम्मद तरबेज उर्फ इरफान शेख या युवकाने आपल्या काही मित्रांच्या मदतीने गंगाजमुना वस्तीत जेवणाची व्यवस्था करणे सुरू केली. एकट्या युवकाने घेतलेला पुढाकार पाहून काही सामाजिक संस्था, पोलिस कर्मचारी आणि संघटनांनीही मदत करण्यास सुरुवात केली. आज गंगाजमुनातील वारांगणा आणि त्यांचा मुलांना दोन वेळेसचे जेवण वेळेवर देण्यात येत आहे. 

आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

गंगाजमुनातील वारांगणांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. साधा तापा आणि सर्दी-खोकल्यासाठी त्या बाहेर पडू शकत नाही. आजुबाजुच्या वस्तीकडून होणारा त्रासही असह्य असल्यामुळे वारांगणा आजारी असल्यानंतरही रूग्णालापर्यंत जाण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे. रेडक्रॉस सोसायटीच्या हेमलता लोहवे या वारांगणांची महिन्यातून एकदा वैद्यकीय चाचणी करतात. त्यामुळे थोडा का होईना दिलासा आहे. 

चहा प्यायला पैसे नाही जी... 
मी एक दोन वेळेसचे जेवण तर मिळते, पण आम्ही पण माणूस आहे. आम्हाला सकाळ आणि सायंकाळी चहा किंवा नाश्‍ताची गरज असते. तर घरात तेल, साबन आणि अन्य आवश्‍यक वस्तूंची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी रुपयासुद्धा जवळ नाही. त्यामुळे आज चहा घ्यायची इच्छा असल्यानंतरही मन मोडून घरात बसावे लागते. 
- एक वारांगणा

गंगाजमुना काल आणि आज

गेल्या काही दिवसांपूर्वी अगदी 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील तरुणी आणि महिला वारांगणांची गजबज गंगाजमुनात होती. मात्र, कोरोनामुळे वयोवृद्ध महिला आणि मुलांची किलबील गंगाजमुनात ऐकायला येत आहे. पोलिस आणि सामाजिक संघटना त्यांना मदत करीत आहेत. मात्र, कालपर्यंत पैसे कमविण्याची ओढ आज केवळ जीवन जगण्यासाठी संघर्षापर्यंत पोहोचली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com