esakal | जलतरणपटूंनो, अजून तीन महिने करावी लागणार प्रतीक्षाच
sakal

बोलून बातमी शोधा

swimming tank not starts in nagpur

राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी इनडोअर खेळांना परवानगी दिल्यानंतर बॅडमिंटन, नेमबाजी, टेबल टेनिस, योगासह इतर खेळांच्या सरावाला सुरुवात झाली. मात्र, जलतरण केंद्र अद्याप सुरू झाले नाही.

जलतरणपटूंनो, अजून तीन महिने करावी लागणार प्रतीक्षाच

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : मनपा कप्रशासनाने हिरवा झेंडा दाखविल्यानंतर शहरातील बहुतांश इनडोअर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिज' सुरू झाल्या आहेत. मात्र, जलतरणपटूंना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. रघुजीनगर येथील कामगार ल्याण केंद्राच्या जलतरण तलावाची डागडुजी करण्यात येत असून, दुरुस्तीसाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे परिसरातील जलतरणपटूंना सरावासाठी आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा - कापसाच्या डिजिटल नोंदणीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार; राजुरा येथे सीसीआय कापूस...

राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी इनडोअर खेळांना परवानगी दिल्यानंतर बॅडमिंटन, नेमबाजी, टेबल टेनिस, योगासह इतर खेळांच्या सरावाला सुरुवात झाली. मात्र, जलतरण केंद्र अद्याप सुरू झाले नाही. नागपूर सुधार प्रन्यासच्या अंबाझरी येथील जलतरण तलावासह शहरातील बहुतांश छोटे-मोठे तलाव बंद आहेत. पूर्व नागपुरातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या रघुजीनगर येथील कामगार कल्याण केंद्राच्या जलतरण तलावाची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याने येथे जलतरणपटूंना सरावास मनाई आहे. आठ महिन्यांपासून सराव बंद असल्याने जलतरणपटूंमध्ये नाराजी आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य व राष्ट्रीय जलतरणपटूंना बसतो आहे. 

हेही वाचा - शाळा सुरू करण्याचे नियोजन चुकीचेच; विरोधी पक्षनेते...

यासंदर्भात जलतरण तलावाचे प्रमुख राजेश पाठराबे यांना विचारले असता ते म्हणाले, कोरोनामुळे तलाव बंद करण्यात आल्यानंतर डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. प्रेशर प्लांट, टाइल्ससह अन्य छोट्यामोठ्या दुरुस्तीला किमान दोन ते तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे या काळात सराव शक्य होणार नाही. याचा तरुण जलतरणपटूंना विशेषतः व्यावसायिक खेळाडूंना त्रास होणार आहे. मात्र, त्याला आमचा नाईलाज आहे. जलतरणपटूंना सराव करायला मिळत नसल्याबद्दल नागपूर जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव डॉ. संभाजी भोसले यांनीही नाराजी व्यक्त केली. परवानगीबद्दल लवकरच जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

loading image