नागपूरकरांसाठी हेल्पलाईन : 'कोरोना'ची लक्षणे आढळल्यास करा या क्रमांकावर फोन

corona helpline
corona helpline

नागपूर : सध्या देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजविला आहे. अनेकांना कोरानामुळे जिवही गमवावा लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जगभरात कोरोना व्हायरसबद्दल भीती निर्माण झाली असतानाच अनेक मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात चिकन खाल्याने "करोना' होण्याची भीती असते हा मॅसेज आघाडीवर असल्याने अनेकांनी चिकन खाणे सोडले आहे.

असे असताना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने काय करावे आणि काय नाही, असा प्रश्‍न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. अशावेळी "कोरोना'बाबत पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्‍वास न ठेवता स्वत:वर विश्‍वास ठेवून निर्णय घेण्याची गरज आहे. 

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत भारतात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरविली जात आहे. एकूणच अफवांचाच "व्हायरस' जास्त धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहेत. जगभरात आतापर्यंत 17,388 लोकांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला असून (सूचना - ही माहिती काही दिवसांपूर्वीच), यातील 17,205 नागरिक चीनमधील आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे.

कोरोनाबाबत अफवा अधिक आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे याची भीती अधिकच बळावली आहे. सोशल मीडिया किंवा एकमेकांचे ऐकूण नागरिक वागत असल्याने धोका अधिकच बळावला आहे. कोरोनाबाबत आणि त्यापासून दूर कसे राहता येईल याचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याशिवाय कोरोनाची दहशत कमी होणार नाही. जसजसं कोरोना अपल्या जवळ येत आहे तसतशी याची भीती व अफवा वाढत जात आहे. यासाठी खालील उपाययोजनांवर तसेच अफवेंवर एक नजर मारून निर्णय घेण्याची गरज आहे. 

कोरोनापासून दूर राहण्यासाठी हे करा

  • साबणाने दर चार तासांनी हात स्वच्छ धुवावे. 
  • किमान 20 सेकंद हात चोळून स्वच्छ धुवावे. 
  • हात धुताना केवळ तळव्यांना साबण लावू नका, तर बोटांच्या मधील जागा, बोटांची अग्र यांना व्यवस्थित साबण लावावा. 
  • खोकलताना रुमाल नाका-तोंडाला लावावा. 
  • रुमाल नसेल तर हाताच्या बाह्याजवळ तोंड नेऊन खोकलावे. 
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. 
  • विनाकारण हस्तांदोलन करणे टाळावे 
  • आजारी व्यक्‍तीपासून दूर राहावे. 
  • मांस चांगल्याप्रकारे शिजलेलेच खावे


कोरोनाबाबत पसरविण्यात आलेली अफवा 

  • कॅफिन पिऊ नका, यामुळे धोका वाढू शकतो. 
  • मद्यपान करणाऱ्याला कोरोना व्हायरसचा धोका नाही. 
  • चिकन खाल्याने कोरोना होतो. 
  • कांदा मीठ लावून खाल्ला की कोरोना होत नाही. 
  • करोनाव्हायरस हा फक्त लसूण मिश्रित पाणी पिल्याने दूर होतो. 
  • काही विशिष्ट प्रकारचे "मास्क' वापरल्यास या आजाराचा संसर्ग होत नाही. 
  • सुपर मार्केट, बाजारपेठा व भाज्यांची दुकाने या संसर्गाची उगमस्थाने आहेत. 
  • चीनमधून ई-मेलद्वारे येऊ शकतो. 
  • हा आजार लिफाफ्यातून किंवा पत्राद्वारे पसरवता येतो. 
  • करोनाव्हायरस अमेरिकेचा चीनविरुद्ध जैविक शस्त्र आहे. 

    येथे करा संपर्क
    नागपुरात कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचे जाणवत जाणवल्यास किंवा लक्षणे आढळल्यास 0712-2562668 या नंबर वर संपर्क करावे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी घरी जाऊन त्या व्यक्तीचे स्वॅप (swap) सॅम्पल घेतील आणि त्याची आवश्यक चाचणी करून रिपोर्ट देतील.
     

करोनाची नव्हे नकारात्मकतेची भीती 
सोशल मीडियाच्या नकारात्मक वापरामुळे करोना व्हायरसची भीती वाढतच चालली आहे. यावर नियंत्रणही सोशल मीडियाच्या सकारात्मक मार्गानी शक्‍य आहे. 
- अजित पारसे, 
सोशल मीडिया विश्‍लेषक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com