राष्ट्रवादीत असंतोष : देशमुख विरोधक ‘प्रफुल्लित’; पेठेंच्या नियुक्तीने धक्का

राष्ट्रवादीत असंतोष : देशमुख विरोधक ‘प्रफुल्लित’; पेठेंच्या नियुक्तीने धक्का

नागपूर : दुनेश्वर पेठे (Duneshwar Pethe) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना जोरदार धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यात भंडारा-गोंदियाच्या वाढत्या हस्तक्षेपाने (Bhandara-Gondia intervention in Nagpur district) देशमुख समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून, ते कोणालाच ‘पटेल' असे सध्यातरी दिसत नाही. (The-appointment-of-Duneshwar-Pethe-as-the-NCP's-city-president-gave-a-shock-to-Anil-Deshmukh)

नागपूर जिल्ह्यातील नियुक्त्यांबाबत अनिल देशमुख यांना नेहमीच विश्वासात घेतले जात होते. त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा. वरिष्ठ पातळीवरून एखाद्याला नियुक्ती द्यायची झाली तर त्यांना विचारणा केली जायची. यावेळी मात्र त्यांचे कट्टर समर्थक माजी अध्यक्ष व विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर यांना थेट राजीनामा द्यायला लावण्यात आला. त्याचवेळी दुनेश्वर पेठे यांना नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादीत असंतोष : देशमुख विरोधक ‘प्रफुल्लित’; पेठेंच्या नियुक्तीने धक्का
किती ही हिंमत! वनविभागाच्या जमिनीवरच पाडले प्लॉट

पेठे हे अहिरकर यांना हटविण्याची वारंवार मागणी करीत होते. अनिल देशमुख यांच्याहीकडे त्यांनी तक्रारी केल्या होत्या. वारंवार विरोधात जात असल्याने मध्यंतरी देशमुख आणि पेठ यांच्यात मतभेदही झाले होते. मात्र, देशमुख निवडून आले. त्यांना राष्ट्रवादीने महत्त्वाचे गृहखाते दिले. त्यामुळे पेठे यांनी पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेतले. या दरम्यान राष्ट्रवादीने विदर्भात विस्तार करण्याचे ठरवले. प्रफुल पटेल यांना विदर्भाची जबाबदारी देण्यात आली. प्रशांत पवार यांनी त्यांना पक्षात आणले. त्यांना अध्यक्षपद देण्याचेही जवळपास ठरले होते. मेट्रो रेल्वेच्या विरोधातील वादग्रस्त आंदोलन, त्यानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे त्यांचे नाव मागे पडले.

राष्ट्रवादीत असंतोष : देशमुख विरोधक ‘प्रफुल्लित’; पेठेंच्या नियुक्तीने धक्का
नवनीत राणा यांनी संसदेत जाऊच नये; आनंदराव अडसूळ यांची टीका

देशमुख विरोधक ‘प्रफुल्लित’

परमबीरसिंग यांच्या आरोपामुळे देशमुख यांना गृह खात्याचा राजीनामा द्यावा लागला. ही संधी साधून त्यांच्या पक्षांतर्गत छुप्या विरोधकांनी खच्चीकरणाचे प्रयत्न सुरू केले. पेठे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना पहिला झटका देल्याचे समजते. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांना कायम ठेवून देशमुख समर्थकांची कोंडी केली जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख व समन्वयक म्हणून पटेल यांचे कट्टर समर्थक माजी आमदार राजू जैन यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासूनच देशमुख विरोधक ‘प्रफुल्लित’ झाले होते.

(The-appointment-of-Duneshwar-Pethe-as-the-NCP's-city-president-gave-a-shock-to-Anil-Deshmukh)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com