esakal | SSC फेरपरीक्षार्थ्यांचे ‘गुण' जुळेना! शिक्षकांची गोळाबेरीज चुकली
sakal

बोलून बातमी शोधा

SSC फेरपरीक्षार्थ्यांचे ‘गुण' जुळेना! शिक्षकांची गोळाबेरीज चुकली

निकालाची प्रक्रिया लांबली असल्याने दोन दिवसांत चुकांची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आली असल्याचे समजते.

SSC फेरपरीक्षार्थ्यांचे ‘गुण' जुळेना! शिक्षकांची गोळाबेरीज चुकली

sakal_logo
By
मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर: दहावीची फेरपरीक्षा (SSC re-examinees) देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अहवालात शिक्षकांनी पाठविलेल्या गुणांची गोळाबेरीज जुळत नसल्याने शिक्षण मंडळाची (Board of Education) डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे निकालाची प्रक्रिया लांबली असल्याने दोन दिवसांत चुकांची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आली असल्याचे समजते.

हेही वाचा: डॉक्टरांनी पत्र देऊन दुसऱ्यांदा मागितली आत्महत्येची परवानगी

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेत राज्यातून ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी राज्यात दहावीच्या निकालात १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, २७ हजार ९०२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली. यंदा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे निकाल नववी आणि दहावीच्या ५० टक्के अंतर्गत गुणाच्या आधारावर लावण्यात येणार आहे. मात्र, परीक्षेला नोंदणी करणारे बरेच विद्यार्थी हे किमान दोन ते तीन वेळा परीक्षा देत अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे पाठविलेल्या गुणात तफावत असल्याचे दिसून येते. एकट्या नागपूर विभागातील २३०० पैकी ७३८ विद्यार्थ्यांच्या गुणात तफावत आढळून आली आहे.

हेही वाचा: उपराजधानीत दोनशेवर डेंगीग्रस्तांची नोंद; लहान मुलांना विळखा

दहावीच्या निकालाचे ९९ टक्के काम पूर्ण

दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल १५ जुलैला जाहीर करण्यासाठीचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले होते. त्याची काटेकोर अंमलबाजवणी देखील करण्यात आली. मात्र, शिक्षण विभागाकडून दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान निकाल याच आठवड्यात जाहीर व्हावा असे नियोजन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकालाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केल्यावर ७ दिवसांनी मार्कशिट्स विद्यार्थ्यांच्या हाती पडतील अशी माहिती आहे.

हेही वाचा: 33 वर्षांपासून झुलताच ‘आसोला मेंढा’चा पाळणा

काम अंतिम टप्प्यात

निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. अंतर्गत गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. गुणांची आलेली माहिती एकत्रित करून अंतिम निकाल तयार करण्यासाठी विभागीय मंडळाकडून राज्य मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या आठवड्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागातून १ लाख ५६ हजार ५६२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

loading image