पत्ताफळीतून महिलांना रोजगाराची आशा; अनेकांच्या हाताला काम

पत्ताफळीतून महिलांना रोजगाराची आशा; अनेकांच्या हाताला काम

कोदामेंढी (जि. नागपूर) : रामटेक वन परिक्षेत्राअंतर्गत बरेचशा भाग जंगलाने व्यापलेला आहे. उन्हाळ्यात शेतीची कामे ठप्प असतात. बरेचशा मजुरांच्या हाताला काम नसते. मात्र, जंगली भागात पत्ताफळीतून अनेकांच्या हाताला काम मिळत असल्याने त्यांचा प्रपंचाचा गाडा सहज चालतो. (The-hope-of-employment-for-women-from-the-Cardamom)

रामटेक वनविभागाअंतर्गत देवलापार, पवनी आणि रामटेक असे तीन ‘रेंज’ आहेत. रामटेक रेंजमधील शिवनी (भों.), भंडारबोडी, भिमानटोला, महादुला, घोगरा, पंचाळा, आसोली, शिवाडौली, हिवरा, कोटगाव, अडेगाव, चिचदा, मुसेवाडी, नवरगाव, सोनेघाट, अंबाळा आदी गावात पत्ताफळी चालते. यात मौदा तालुक्यातील देखील गावे समाविष्ट आहेत. पत्ताफळीतून जवळपास १,५०० लोकांना रोजगार मिळतो. सुरुवातीच्या काळात याचा व्याप अधिक होता. मात्र, दिवसेंदिवस टेंभरू वनस्पतीमध्ये होणारी घट बघता कमीपणा आलेला आहे.

पत्ताफळीतून महिलांना रोजगाराची आशा; अनेकांच्या हाताला काम
धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

वनविभागामार्फत याचे टेंडर होत असून महसूल प्राप्त होतो. सुरुवातीच्या काळात बोली लागायची मात्र आता ‘ऑनलाइन’ टेंडर निघत असल्याने महसुलात देखील तितकीच घट झाली आहे. त्याचा परिणाम मजुरांना मिळणाऱ्या बोनसवर देखील झाला आहे. यावर्षी रामटेक युनिटचा तीन लाख १८ हजार २०७ मध्ये तर मौदा युनिटचा सात हजार ९९७ रुपयात ठेका झाला.

पत्ताफळीतून शेकडा (शंभर पुडे) २२७ रुपये मजुरी मिळत असून कुटुंबातील लहान मोठे सर्वच जंगलात जाऊन पाने गोळा करतात. त्याचे पुडे बांधून केंद्रावर नेतात. एका पुड्यात ६० ते ६५ पाने बांधले जातात. दिवसाला एक कुटुंब दीडशे ते दोनशे पुडे बांधते. यामुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळतो. मे महिन्यात या व्यवसायाला भरभराटी असते.दरवर्षी या कामावरील मजुरांना चार सहा महिन्यात बोनस मिळायचा. मात्र वर्षभऱ्यापासून बोनस मिळाला नसल्याने मजुरांमध्ये नाराजीचा सूर आहे.

पत्ताफळीतून महिलांना रोजगाराची आशा; अनेकांच्या हाताला काम
वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो
ज्यांनी खाते क्रमांक बरोबर दिले नसतील त्यांची बोनसची रक्कम जमा झाली नसेल. बोनसची रक्कम जमा व्हायला विलंब लागत नाही. एकंदरीत जमा झालेल्या मालाहून (पुडे) बोनसची राशी ठरत असते. कोरोनामुळे कदापी उशीर झाला असावा.
- देवेंद्र अगळे, वन क्षेत्रसहाय्यक रामटेक
दरवर्षी जवळपास दिवाळीत बोनस मिळतो. पण मागील वर्षीचा बोनस अद्याप मिळाला नाही. माझ्या गावातील बऱ्याच मजुरांना मिळाले नाही.
- भोला सहारे, शिवाडौली
पत्ताफळीतून महिलांना रोजगाराची आशा; अनेकांच्या हाताला काम
नोट फाटली तर काय करायचं? जाणून घ्या नियम
मजुरी बरोबर मिळत नाही. रोजी निघत नाही. पण काम चालू असल्याने करावे लागते. बोनस आणि मजुरीत वाढ व्हायला पाहिजे.
- प्रमिला मरस्कोल्हे, मजूर महिला

(The-hope-of-employment-for-women-from-the-Cardamom)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com