esakal | कैद्यालाही मिळणार पत्नीच्या प्रसुतीसाठी रजा; नियमात सुधारणा
sakal

बोलून बातमी शोधा

कैद्यालाही मिळणार पत्नीच्या प्रसुतीसाठी रजा; नियमात सुधारणा

कैद्याला आता मुलांच्या जन्माच्या वेळी उपस्थित राहता येणार आहे.

कैद्यालाही मिळणार पत्नीच्या प्रसुतीसाठी रजा; नियमात सुधारणा

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर: तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्यांना आता पत्नीच्या प्रसुतीसाठीही अभिवचन व वंचित रजेसाठी अर्ज करता येणार असल्याने बाप बनणाऱ्या कैद्याला आता मुलांच्या जन्माच्या वेळी उपस्थित राहता येणार आहे.

हेही वाचा: नागपूर : मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध; वर्चस्वासाठी राडा

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित रजा (फर्लो) व अभिवचन रजेच्या (पॅरोल) माध्यमातून काही दिवसांसाठी कारागृहातून बाहेर येता येते. संचित रजा २१ तर अभिवचन रजा ४५ दिवसांपर्यंत असते. मुलीचे व्यक्तीचे लग्न, मृत्यू झाल्यास कैद्यास या रजा देण्यात मंजूर करण्यात येते. संचित रजा या डीआयजीच्या मंजुरीने देण्यात येते. तर अभिवचन रजा मंजूर करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. ‘डेथ’ फर्लोच्या माध्यमातून १४ दिवसांची रजा मंजूर होत असून याचे अधिकार कारागृह अधीक्षकांना असल्याचे सांगण्यात येते. या करता कैद्याचे वर्तणूकही पाहण्यात येते.

हेही वाचा: मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला घेतलं कामावर; नागपूर मनपाचा कारभार

कैद्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यास व त्याच्यामुळे इतरांना धोका असल्याचे मत झाल्यास रजा देण्यात येत नाही. सक्षम प्राधिकाराकडून रजेचा अर्ज नामंजूर करण्यात आल्यास उच्च न्यायालयात कैदी दाद मागू शकतो. संचित व अभिवचन रजेवर कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यास रोज किंवा आठवड्यातून दोन दिवस संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावणे आवश्यक आहे. शासनाने कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा) नियम १९५९ मध्ये सुधारणा केली आहे. १३ जुलैला याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. यानुसार पत्नीच्या प्रसूतीसाठीही संचित व अभिवचन रजेकरता अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा: नागपूर : तरुणाने बाईकसह घेतली तलावात उडी

पत्नीच्या प्रसूतीच्या वेळी काही कागदोपत्री कारवाई करावी लागते. पती नसल्याने अडचण होते. हे लक्षात आल्याने सरकारने नियमात सुधारणा केल्याचे सांगण्यात येते. आकस्मिक अभिवचन रजेवर सोडण्याचा अर्ज प्राधिकाऱ्याने नाकारल्यास कैद्याला पाच दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करता येणार आहे. काही कारणास्तव कैद्यास पाच दिवसाच्या आत अपील करता आली नाही आणि विभागीय आयुक्तांची खात्री पटल्यास पाच दिवसानंतरही अर्ज करता येणार आहे. अशा प्रकरणात विभागीय आयुक्तांना निर्णय अंतिम राहणार आहे.

loading image