नागपूर : नव्या अभ्यासक्रमाचा पेपर विद्यार्थ्यांना मिळालाच नाही

बी.एसस्सी गणित -१ च्या पेपरमध्ये गोंधळ
Nagpur University
Nagpur Universitysakal

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे(nagpur university) घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहेत. यामध्ये सोमवारी सकाळी ८ ते ११ दरम्यान बी.एसस्सी तृतीय सत्राच्या गणित -१ या पेपरमध्ये नव्या अभ्यासक्रमाचा पेपरच विद्यार्थ्यांना मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जवळपास ७०० विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याचे दिसून आले. (700 students deprived of exams in nagpur university)

Nagpur University
नांदगाव : लष्करातील जवानाचा अपघातात मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

विद्यापीठाद्वारे हिवाळी परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ४९ परीक्षा पार पडल्या. आता दुसऱ्या टप्प्यात तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील १४७ परीक्षांपैकी ५० अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. आज सकाळी बी.एसस्सी तृतीय वर्षाच्या गणित-१ या विषयाच्या पेपर सकाळी ८ ते ११ दरम्यान घेण्यात आला. यामध्ये ५ हजार ६७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, यामध्ये केवळ जुन्या अभ्यासक्रमातील पेपर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून अपलोड करण्यात आला होता. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पेपर देताच आला नाही. या प्रकाराने ४ हजार ३६९ विद्यार्थ्यांनी पेपर दिला. मात्र, उर्वरित ६९८ विद्यार्थी पेपर देण्यापासून वंचित असल्याचे दिसून आले. दरम्यान या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये संपर्क करीत, माहिती दिली. २५ जानेवारीला या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे परिपत्रक विद्यापीठाने काढले.

Nagpur University
तिहेरी अपघातात एकजण गंभीर जखमी

नव्या अभ्यासक्रमाचा पेपर सेटच मिळाला नाही

विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाद्वारे(Evaluation Department) मिळालेल्या सेटच्या आधारावर त्या-त्या विषयांची परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार विभागाला परीक्षेच्या तारखांनुसार केवळ गणित -१(maths 1paper) या विषयाच्या जुन्या अभ्यासक्रमांचे सेट मिळाले. मात्र, संबंधित टास्क फोर्सकडून नव्या अभ्यासक्रमाचे सेट न मिळाल्याने हा गोंधळ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत विद्यापीठ किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.

२५ जानेवारीला फेरपरीक्षा

सोमवारी घेण्यात आलेल्या पेपरमध्ये विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा २५ जानेवारीला घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक विद्यापीठाच्या(nagpur university) परीक्षा आणि मूल्यमापन विभागाद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रकात कळविण्यात आले आहे. मात्र, २२ जानेवारीला होणारा गणित -२ या विषयाचा पेपर ठरलेल्या वेळेप्रमाणे घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com