
अंभोरा रस्त्याच्या अनेक नागमोळी वळणावरून वळणाऱ्या चारचाकी वाहनाच्या प्रकाशझोतात डोंगररांगांवर निर्माण होणाऱ्या आभासी प्रतिमा कपोलकल्पित भुताचे विश्व नेहमीच उभे करीत असतात. हे विश्व अंभोरा डोंगरावर आढळत असलेल्या एका वृक्षामुळे निर्माण होत असते.
झाडं ऑक्सिजन देतात हे तर माहीतच आहे; मात्र, या झाडांमुळे...
वेलतूर (जि. नागपूर) : औषधी गुणधर्म असलेल्या करू झाडाचा आणखी एक खास वैशिष्ट म्हणजे या झाडाच्या खोडाचा रंग ऋनूनुसार बदलतो. उन्हाळ्याच्या दिवसांत पांढरा होतो. हिवाळ्यात गुलाबी आणि पावसाळ्यात गर्द हिरव्या रंगामुळे हे झाड कुणाचेही लक्ष वेधून घेते. औषधी गुणधर्मासोबत वेगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे या वृक्षाला महत्त्व आहे. परंतु, बेसुमार वृक्षतोडीमुळे ही झाडे दुर्मीळ होत असल्याने त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे.
झाडांवर भूत असल्याचे अनेक रंजक कथा आपण बालपणी ऐकल्या आहेत. बदलत्या काळासोबत या दंतकथा पुस्तकात किंवा त्या पिढीसोबतच गडप झाल्या असल्या तरी आजही त्या ऐकल्या तर भीती वाटते. अंभोरा रस्त्याच्या अनेक नागमोळी वळणावरून वळणाऱ्या चारचाकी वाहनाच्या प्रकाशझोतात डोंगररांगांवर निर्माण होणाऱ्या आभासी प्रतिमा कपोलकल्पित भुताचे विश्व नेहमीच उभे करीत असतात. हे विश्व अंभोरा डोंगरावर आढळत असलेल्या एका वृक्षामुळे निर्माण होत असते.
क्लिक करा - ऑनलाईन व ऑफलाईन स्तरावर सुरू होणार शाळा, प्रायोगिक तत्वावर केवळ इयत्ता पाचवीपासून सुरुवात
भुताचे झाड म्हणून ओखळ असलेला करू वृक्ष तंत्र-मंत्र जाणणाऱ्या जाणत्या वैदूचे मुख्य हत्यार असल्याचे सांगितले जाते. या वृक्षावर अनेक दैत्याचा वास असल्याच्या कथा पुराणात सांगितल्या जातात. जुने जाणते लोक आपल्या वंशजांना या झाडाचा कथा रंगवून सांगतात. अनेक वैदू करू वृक्षाची बाधा झाल्याचे सांगून आपला व्यवसाय चालवतात.
उन्हाळ्यात हा वृक्ष अधिकच शुभ्र होत असल्याने इंग्रजीत याला "इंडियन घोस्ट ट्री' म्हणतात. त्याचा डिंक मौल्यवान असल्याने डिंकासाठी या झाडाला ठिकठिकाणी खाचा पाडून अखेर त्याचा खूनच केला जातो. नेकेड ब्युटी ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखले जाणारे करू किंवा भुत्या स्ट्रेनलिया युरेन या नावानेही ओळखले जातात. वनस्पती विश्वात मौल्यवान वनस्पती म्हणून त्याची गणना होते. त्याच्यातील औषधी गुणधर्मांमुळे तो अनेकांच्या गळ्यातला ताईत आहे.
कॅप्सुलचे वेष्टन
आधुनिक औषधी शास्त्रात वापरण्यात येत असलेल्या कॅप्सुलचे वेष्टन याच करू वृक्षाच्या डिंकापासून तयार केले जाते. त्यामुळे या वृक्षाच्या डिंकाला मोठी मागणी आहे. याशिवाय पाने, खोड, मूळही आरोग्यवर्धक असल्याने आयुर्वेदात या वृक्षाला मोठे स्थान आहे. त्यामुळे या झाडांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
दुर्मीळ वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड
"करू' हे दुर्मीळ वृक्ष अंभोऱ्याच्या डोंगररांगांवर व जंगलात मोठ्या प्रमाणात आहेत. वेलतूरकडून जाताना मेढा व कोल्हासूर डोंगरांवर त्यांचे अस्तित्व रात्रीच्या प्रवासात व पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना चांगलेच कापरे भरविणारे असते. मात्र, अलीकडे या दुर्मीळ वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे.
अधिक माहितीसाठी - प्रादेशिक हवामान विभागाने दिला पुन्हा इशारा, धानपट्टा भागात होणार हे...
भू... भू... भूतच... होय भूतच ते..
रात्रीचा किर्रर अंधार, सारं काही शांत शांत... रातकिड्यांचा आवाज तेवढा आसमंतात घुमतोय... दिवसाला सूर्यप्रकाशात हिरवीगार दिसणारी डोंगररांग अंधारात गडप झालेली... मात्र, तेवढ्या अंधारात काही धुरसट पांढुरक्या प्रतिमा चंद्रप्रकाशात नजरेसमोर खेळतात... अन् शरीराला चांगलेच कापरे फुटतात... नको नको ते विचार मनात रुंजी घालू लागतात... भू... भू... भूतच... होय भूतच ते... अशी ओळय या वृक्षाची झाली आहे.
संपादन - नीलेश डाखोरे