बँक मॅनेजर बोलतोय, एटीएमचा पासवर्ड सांगा! म्हणत केले 50 हजार लंपास

atm
atm

नागपूर  : बँक मॅनेजर बोलत असून तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. एटीएम कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी पासवर्ड सांगा, अशी बतावणी करून सायबर चोरट्याने एका व्यक्‍तीच्या खात्यातून चक्‍क 50 हजार रूपयांची रक्‍कम लंपास केली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. अजय रामकृपाल पांडे (50, रा. वैशाली नगर, विद्यापती नगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पांडे यांना 29 एप्रिलला दुपारी 4 वाजताच्या सुमारास 7250948044 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. चोरट्याने बँकेचा ब्रँच मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. एटीएम कार्ड पुन्हा सुरू करायचे असेल तर कार्ड वरील 16 अंकी नंबर सांगा. अजय पांडे यांनी ठगबाजाला कार्डचा नंबर सांगितला. त्यांनंतर अजय यांच्या मोबाईलवर 6 अंकी नंबर आला. तो नंबर ठगबाजाने सांगण्यास भाग पाडले. अजय यांनी नंबर सांगताच त्यांच्या खात्यातून ऑनलाईन 49 हजार 999 रुपये परस्पर काढण्यात आले. पैसे खात्यातून काढण्यात आल्याचे समजताच आपली फसवणूक झाल्याचे अजय यांच्या लक्षात आले.

त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. बँकेतून फोन आल्यानंतर खात्री केल्यानंतरच व्यवहार करा, तसेच कोणालाही पासवर्ड किंवा एटीएम कार्डचा क्रमांक सांगू नका, असे अनेकदा आवाहन करूनही नागरिक फसत आहेत. त्यामुळे सायबर क्राईमवरील तपासाचा ताण वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com