
नागपूर : शहरात दररोज बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे प्रशासनात चिंतेचा सूर आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४२२ नवे बाधित आढळून आले. यात शहरातील ३३४ जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या ९० हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दरम्यान, आज सात कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. यात शहरातील पाच जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात दररोज चारशेवर बाधित आढळत आहेत. दिवाळीनंतर बाधितांच्या संख्येत वाढ होत असली, तरी नागरिकांत कोरोनाच्या बाबतीत भीती नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आज ५ हजार ९६ जणांचा अहवाल आला. यातून ४२२ नवे बाधित आढळून आले. यात शहरातील ३३४ तर ग्रामीणमधील ८७ जणांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १ लाख १३ हजार ६९१ पर्यंत पोहोचली.
शहरातील बाधितांची संख्या ८९ हजार ८९७ असून ग्रामीणमधील एकूण बाधित २३ हजार ९३ आहेत. जिल्ह्याबाहेरील ७०० जण बाधित आढळून आले. शुक्रवारी जिल्ह्यात ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील पाच तर ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या ३ हजार ७१४ पर्यंत पोहोचली. यात शहरातील बळींची संख्या २ हजार ५५५ पर्यंत पोहोचली. ग्रामीण भागात एकूण ६४१ जणांचा बळी गेला.
शहरात उपचार घेत असलेल्या जिल्ह्याबाहेरील ५१८ जणांनी शेवटचा श्वास घेतला. दररोज बाधित वाढत असल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शहरात सद्यःस्थितीत ५ हजार ५७८ बाधित उपचार घेत आहेत. यात शहरात ४ हजार ७४४ बाधित उपचार घेत असून, ग्रामीणमध्ये ८३४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील ४ हजार १२२ घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक कोविड केअर सेंटर सध्या रिकामे आहेत.
शुक्रवारी २६२ बाधित कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ४ हजार ३९९ पर्यंत पोहोचली. दररोज वाढणारे बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत घट होत असल्याने जिल्ह्यात सक्रिया रुग्णांची संख्या वाढत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ५७८ रुग्ण घरीच किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.