Gadchiroli Forest : रानडुकरांच्या शिकारीसाठी सोडलेल्या वीज प्रवाहाने वाघ जागीच ठार; तीन पंजे, डोक्याचा काही भाग गायब

चातगाव वन क्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे.
Tiger Killed by Electric Current Gadchiroli
Tiger Killed by Electric Current Gadchiroliesakal
Summary

करंटने शिकार झालेल्या वाघाचे तीन पंजे, तसेच वाघाच्या डोक्याचा काही भाग गायब झाला आहे.

गडचिरोली : रानटी डुकरांची शिकार करण्यासाठी विद्युत प्रवाह (Electric Current) सोडला; पण यात डुक्कर न अडकता वाघ (Tiger) अडकून त्याची शिकार झाली. ही घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.

गडचिरोली वन विभागांतर्गत (Gadchiroli Forest Division) येणाऱ्या चातगाव वन क्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. लोकांना या वाघाचे अधूनमधून दर्शन होत होते. अशातच मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास गुराखी गुरे चालत असताना वाघ मृतावस्थेत दिसला. त्याने काही लोकांना याबाबत माहिती दिली.

Tiger Killed by Electric Current Gadchiroli
Karnataka Politics : 'या' दोन बड्या नेत्यांमधला वाद टोकाला; हायकमांड करणार हस्तक्षेप, काँग्रेस सरकार धोक्यात?

त्यानंतर वनाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. वनविभागाचे अधिकारी सकाळी दहा वाजतापर्यंत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनाम्याची कार्यवाही केली. दरम्यान, गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे व वन विभागाने अधिकारी उपस्थित होते.

Tiger Killed by Electric Current Gadchiroli
Maratha Reservation : मराठा समाजाचे एवढे आमदार असूनही आरक्षण देत नाहीत, पण आम्ही हे मुद्दाम..; काय म्हणाले अजितदादा?

वाघाच्या डोक्याचा काही भाग गायब

करंटने शिकार झालेल्या वाघाचे तीन पंजे, तसेच वाघाच्या डोक्याचा काही भाग गायब झाला आहे. पुढचे दोन्ही पंजे व मागील डावा पंजा अज्ञात लोकांनी नेला आहे.

प्रथमदर्शनी वाघाला करंट लावून मारल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, यासह विविध बाबी चौकशीनंतरच स्पष्ट होतील.

-मिलिश शर्मा, उपवनसंरक्षक गडचिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com