विदर्भातील वाघ खानदेशात स्थिरावला; ‘गौताळा’ असे केले नामकरण

विदर्भातील वाघ खानदेशात स्थिरावला; ‘गौताळा’ असे केले नामकरण

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर येथून आलेला वाघ येथील जळगाव जिल्ह्यातील गौताळा औट्रमघाट अभयारण्यात स्थिरावला आहे. सात ते आठ महिन्यांपासून मुक्काम ठोकल्याने वाघाचे ‘गौताळा’ असे नामकरण केले आहे. या वाघाने अंदाजे तेलंगणासह विदर्भातील विविध संचार मार्गातून दोन हजार किलो मीटरचा प्रवास करून गौताळ्यात अधिवास केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारले आहे. गौताळ्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा वाघ आढळला. वन कर्मचाऱ्यांना ११ ते १४ मार्च दरम्यान प्रथम वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या. गस्तीत वाघाच्याच पायाचे ठसे असल्याचे समोर आले. तसेच वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातही तो कैद झाला.

विदर्भातील वाघ खानदेशात स्थिरावला; ‘गौताळा’ असे केले नामकरण
अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक

सात महिन्यांपासून गौताळ्यात वाघाने वास्तव्य केले आहे. येथील अधिवास व तृणभक्षक प्राण्यांच्या उपलब्धता चांगली असल्याने स्थिरावल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वाघ हा निसर्गातील जैविक साखळीमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने वन्यजीव विभागाकडून दक्षता घेतली जात आहे.

गौताळ्यात १९४० मध्ये सर्वप्रथम वाघ आढळून आला होता. त्यानंतर १९८१ मध्ये म्हणजे ४० वर्षापूर्वी वाघ दिसला होता. त्यानंतर आईपासून विभक्त झालेला एक अडीच वर्षांचा वाघ डिसेंबर २०१९ मध्ये अजिंठा वनक्षेत्रात आला होता. तो वाघ काही दिवस मुक्काम केल्यावर तो परतीच्या मार्गावर गेला होता. काही दिवस मुक्काम केल्यावर तो परतीच्या मार्गावर गेला होता. तो वाघही टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचे समोर आले होते.

वाघाचा भ्रमण मार्ग

वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून आला आहे. तो दीड वर्षापासून अधिवास शोधण्यासाठी भ्रमंती करीत होता. त्यासाठी त्याने नैसर्गिक अधिवासाचा वापर केला. पांढरकवड्यातून तो सर्व प्रथम तेलंगणामध्ये गेला. तेथून परत नांदेड, किनवट, पुसद, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य, अजिंठामार्गे गौताळ्यात दाखल झाला आहे.

विदर्भातील वाघ खानदेशात स्थिरावला; ‘गौताळा’ असे केले नामकरण
७६ वर्षीय पांडुरंगांची अशीही भक्ती; सायकलने वैष्णोदेवीचा प्रवास
यवतमाळ जिल्ह्यातून औरंगाबाद आणि गौताळा अभयारण्यात गेलेले वाघ सध्यातरी स्थिरावलेला आहे. मात्र, अधूनमधून तो भ्रमंतीवर असतो. तो त्याच भागात राहावा म्हणून अधिवास विकासावर भर दिला जात आहे. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आलेले आहेत.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
गौताळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात तृणभक्षक प्राणी आहे. त्यामुळेच वाघ स्थिरावलेला आहे. त्या परिसरात मानवी हस्तक्षेपही अतिशय कमी असल्याने वाघाने मुक्काम ठोकला आहे.
- विजय सातपुते, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव विभाग औरंगाबाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com