

Nagpur Accident
sakal
नागपूर: वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरबी परिसरात गुरुवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. घरासमोर खेळत असलेल्या १८ महिने वयाच्या चिमुकलीला भरधाव टेम्पोने धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या बालिकेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. प्रियांशी विष्णू देवपाच असे मृत बालिकेचे नाव आहे.