esakal | सोमवारपासून नवीन नियम : हे होणार बदल; दुकानांची वेळही बदलली
sakal

बोलून बातमी शोधा

सोमवारपासून नवीन नियम : हे होणार बदल; दुकानांची वेळही बदलली

सोमवारपासून नवीन नियम : हे होणार बदल; दुकानांची वेळही बदलली

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : कोरोना (coronavirus) नियंत्रिणात येत असल्याने निर्बंधही शिथिल (Restrictions are relaxed) करण्यात येत आहे. २१ जूनपासून ट्युशन क्लासेस तसेच गोरेवाडा जंगल सफारी सुरू (Tuition classes as well as Goregaon Jungle Safari started) करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी काढले. याशिवाय शहरातील सर्व दुकानांना रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात (unlock) आली आहे. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. (Tuition-classes-and-Gorewada-Jungle-Safari-starting-from-Monday)

ऑक्सिजन बेड ९५ किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्यांनी रिक्त असलेल्या शहरांत निर्बंध शिथिल करण्यात आले. मागील ७ जून रोजी शहर पाच वाजेपर्यंत सुरू करण्यात आले होते. दर शुक्रवारी आढावा घेतल्यानंतर निर्बंधात शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूरकरांना दिलासा दिला.

हेही वाचा: घ्या बोंबला! वाहतूकमंत्री नितीन गडकरीच अडकले वाहतूक कोंडीत!

अनेक दिवसांपासून ट्युशन क्लासेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आज जिल्हाधिकारी व आयुक्तांनी केवळ २० विद्यार्थ्यांसह ट्युशन क्लासेस सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे कोचिंग क्लासेस संचालकांसह विद्यार्थी, पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

याशिवाय अनेक दिवसांपासून कुठेही फिरता न आल्याने अस्वस्थ झालेल्या नागपूरकरांसह जिल्ह्यातील नागरिकांसाठी गोरेवाडा जंगल सफारीही सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. शहरातील दुकाने, मॉल, मल्टिप्लेक्स, थिएटर, नाट्यगृहांना रात्री आठ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. परंतु, मल्टिप्लेक्स, मॉल, नाट्यगृहांना ५० टक्के क्षमतेनेच परवानगी देण्यात आली आहे. मॉलमधील रेस्टॉरंटलाही रात्री अकरा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली.

हेही वाचा: ‘मविआ’ची ‘हेराफेरी’ : ओबीसींच्या आरक्षणावर हे तीन नेते प्रमुख भूमिकेत

धार्मिक स्थळे, जलतरण बंदच

शहरातील शाळा, महाविद्यालय बंदच ठेवण्यात आले आहे. याशिवाय धार्मिक स्थळे, जलतरण तलावही बंद राहणार आहे. विशेष म्हणजे जलतरण तलावाबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. क्रीडा संकुलाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता जलतरणपटूही परवानगीच्या प्रतीक्षेत आहे.

(Tuition-classes-and-Gorewada-Jungle-Safari-starting-from-Monday)

loading image
go to top