

Uddhav Thackeray Marathwada Vidarbha tour
esakal
Maharashtra Political News : शिवसेना (ठाकरे गटातील) सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. पक्षाला बसलेल्या या मोठ्या धक्क्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन संघटनात्मक ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांना नव्याने उभारी देत पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी २७ ते २९ जूनदरम्यान त्यांचा मराठवाडा आणि विदर्भातील वेळापत्रक समोर आले आहे.