

“Residents of Tilaknagar Favor Local Candidate for Municipal Elections”
Sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच डोंबिवलीतील टिळकनगर प्रभागात राजकीय असंतोषाला नवे वळण मिळू लागले आहे. एकेकाळी स्वच्छ, सुंदर, हिरवळीने नटलेला आणि राहणीमानाच्या निकषांवर आदर्श मानला जाणारा हा प्रभाग मागील काही वर्षांत दुरावस्थेला सामोरा गेला आहे. कचऱ्याचे ढीग, अनियंत्रित पार्किंग, गंडलेले रस्ते आणि हरवलेले देखणेपण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी यंदाच्या निवडणुकीत एक वेगळा आणि ठोस कौल दिला आहे— “उपरा नको, टिळकनगरचा नगरसेवक टिळकनगरचाच हवा.”