esakal | आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयातच उसणवारीवर लसीकरण, ३०० नागरिकांना बाहेरचा रस्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccinations

आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयातच उसणवारीवर लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी कोव्हॅक्सिनचे सुमारे १० हजार ७४० डोस असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात येत आहे. मात्र, यानंतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) लसीकरण केंद्रावर पहिला डोस का दिला जात नाही? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. कोव्हॅक्सिनचा मुबलक साठा मिळत नसल्यामुळे मेडिकलचे लसीकरण उसणवारीवर सुरू असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

हेही वाचा: 'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'

केंद्रशासनाच्या पुढाकाराने लसीकरण मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली. जिल्ह्यात सर्वत्र कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची लस दिली जात आहे. आतापर्यंत मेडिकलमध्ये १५ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोव्हॅक्सिनचा डोस दिला गेला आहे. तर दर दिवसाला तीनशेवर नागरिक पहिल्या डोससाठी मेडिकलमध्ये येतात, मात्र यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनाच लस मिळेल असे फर्मान सोडण्यात आले आहे. आतापर्यंत सहा हजारावर नागरिकांना दुसरा डोस लावला आहे. आणखी ९ हजार व्यक्तींना दुसरा डोस द्यायचा आहे. मात्र, केंद्रशासनाकडून कोव्हॅक्सिन लसींचा अल्प प्रमाणात पुरवठा होत असल्याने पहिला डोस देण्याच्या मोहिमेला थांबा लावला आहे.

loading image