

A towering figure in public service, Dattatraya Meghe is remembered for his five-decade-long contribution to society.
esakal
नागपूर: विदर्भाचे राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या पाच दशकांपासून आपला दबदबा निर्माण करणारे माजी खासदार आणि माजी मंत्री दत्ता मेघे यांचे आज त्यांच्या खामला येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सलग चार वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले दत्ता मेघे राज्याचे कॅबिनेट मंत्रीही होते. कट्टर विदर्भवादी नेते अशी त्यांची ओळख होती.