esakal | विदर्भातील अनेक जिल्हे तहानलेलेच; अकोला व गोंदिया रेड झोनमध्ये, बळिराजा चिंतित
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भातील जिल्हे तहानलेलेच; अकोला व गोंदिया रेड झोनमध्ये

विदर्भातील जिल्हे तहानलेलेच; अकोला व गोंदिया रेड झोनमध्ये

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : अख्खा जून आणि सर्वाधिक पावसाचा अर्धा जुलै संपूनही अद्याप विदर्भातील अनेक जिल्हे तहानलेलेच आहेत. अकोला आणि गोंदिया हे दोन जिल्हे रेडझोनमध्ये असून, पुरेशा पावसाअभावी इतरही जिल्ह्यांची याच दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे. त्यामुळे बळीराजाचीही चिंता वाढली आहे. (Vidarbha-is-still-not-getting-enough-rain-nad86)

विदर्भात दरवर्षी सरासरी ९४३ मिलिमीटर पाऊस बरसतो. मात्र १ जूनपासून आतापर्यंत केवळ ३३२ मिलिमीटरच पाऊस पडला आहे. हा सरासरीइतका पाऊस असला तरी, अनियमित पावसामुळे अनेक जिल्ह्यांची स्थिती बिकट आहे. सर्वाधिक चिंताजनक स्थिती अकोला आणि गोंदिया जिल्ह्यांची आहे. येथे अनुक्रमे ३२ टक्के व २० टक्के कमी पाऊस पडला आहे. बुलडाणा (उणे १९ टक्के), अमरावती (उणे ६ टक्के) आणि गडचिरोली (उणे ५ टक्के) या जिल्ह्यांचीही रेडझोनकडे वाटचाल सुरू आहे.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

सरासरी पावसात वाशीम (अधिक २२ टक्के), चंद्रपूर (अधिक १८ टक्के), यवतमाळ (अधिक १८ टक्के) आणि भंडारा (अधिक १६ टक्के) हे चार जिल्हे सध्या आघाडीवर आहेत. नागपूर जिल्ह्यातही परिस्थिती ठीकठाक आहे. दमदार पावसाचे केवळ दोन नक्षत्र शिल्लक असून, त्यात वरुणराजाची कृपादृष्टी होईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

केवळ तीनच दिवस दमदार पाऊस

भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीच्या शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी, आतापर्यंत पावसाने निराशाच केली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यात केवळ तीनच दिवस दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस ८ जुलै रोजी कोसळला होता. तर १२ जूनला ९६ मिलिमीटर आणि ११ जुलै रोजी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

धानपट्ट्यात सर्वाधिक गरज

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर हे चार जिल्हे धानपट्ट्याचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. यातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र उर्वरित दोन जिल्हे अजूनही दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. पुरेशा पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या आहेत. या भागांत पावसाची सर्वाधिक गरज आहे.

हेही वाचा: बोंबला! निकालाचे संकेतस्थळच ‘क्रॅश’; विद्यार्थ्यांची धावपळ

विदर्भातील आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जिल्हा प्रत्यक्ष पाऊस सरासरी पाऊस

 • नागपूर ३५० ३३५

 • अकोला १६७ २४५

 • अमरावती २६२ २८०

 • वर्धा ३५१ ३१४

 • यवतमाळ ३४४ २९२

 • भंडारा ४५० ३८७

 • गोंदिया ३२५ ४०८

 • चंद्रपूर ४३२ ३६२

 • गडचिरोली ३९९ ४१८

 • वाशीम ३४९ २८६

 • बुलडाणा ४५० ३८७

हेही वाचा: पोहणे बेतले जिवावर; खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू

सध्या दमदार पावसासाठी आवश्यक असलेल्या सिस्टीमचे कसलेही संकेत नसल्यामुळे विदर्भात येत्या काही दिवसांत धो-धो पावसाची शक्यता खूप कमी आहे. केवळ 'लोकल डेव्हलपमेंट'मुळेच थोडाफार पाऊस अपेक्षित आहे.
- मोहनलाल साहू, संचालक, प्रादेशिक हवामान विभाग

(Vidarbha-is-still-not-getting-enough-rain-nad86)

loading image