Vidhan Parishad Election : काँग्रेसचे धक्कातंत्र ! भाजपचे डॉ. रवींद्र भोयर यांचा आज काँग्रेस प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचे धक्कातंत्र ! भाजपचे डॉ. रवींद्र भोयर यांचा आज काँग्रेस प्रवेश
Vidhan Parishad Election : काँग्रेसचे धक्कातंत्र ! भाजपचे डॉ. रवींद्र भोयर यांचा आज काँग्रेस प्रवेश

काँग्रेसचे धक्कातंत्र ! भाजपचे डॉ. रवींद्र भोयर यांचा आज काँग्रेस प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार घोषित करून धक्का देण्याची परंपरा कॉंग्रेस विधानपरिषद निवडणुकीसाठीही कायम ठेवणार असल्याचे चित्र आहे. शनिवारी रात्रीपर्यंत राजेंद्र मुळक यांचे नाव निश्चित असल्याचे सांगणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनाही उद्या, सोमवारी धक्का बसणार आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर उद्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असून आज दिवसभर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

भाजपने माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अर्ज दाखल करण्याची पूर्ण तयारी केली. परंतु, कॉंग्रेसमध्ये उमेदवाराबाबत संभ्रम दिसून आला. आज दिवसभर भाजपचे रेशिमबागेतील नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे अनेक कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता दिसून आली. दरम्यान, काल रात्री शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी राजेंद्र मुळक उमेदवार असतील, असे सांगितले होते. पान २ वर

आज मात्र, त्यांचाही सूर बदलेला दिसून आला. डॉ. रवींद्र भोयर उद्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात आज देवडिया भवनात कॉंग्रेसची बैठक पार पडली असून डॉ. भोयर यांच्या उमेदवारीबाबत दिवसभर सुरू असलेली चर्चा खरी ठरण्याची शक्यता आहे. राजेंद्र मुळक विधानपरिषदेसाठी अनुत्सुक असल्याचे सुत्राने नमुद केले. परंतु डॉ. भोयर यांचीही उमेदवारी निश्चित नसल्याचे कॉंग्रेसमधील सुत्राने सांगितले. एकूणच कॉंग्रेसची उमेदवाराबाबत गोंधळाची परंपरा येथेही कायम दिसून येत आहे. पक्षात दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणूक बघता डॉ. भोयर दबावतंत्राचा वापर करीत असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. डॉ. भोयर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक आहे. ते नासुप्रचे विश्वस्त होते. भाजपने त्यांना उपमहापौरपदही दिले होते. त्यांनी वर्धा येथे झालेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरा दरम्यान काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचीही चर्चा होती.

हेही वाचा: लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राची नवी आयडीया; लकी ड्रॉ आणि इतर उपक्रमांचा घेणार आधार

डॉ. भोयर यांच्यासोबत कोण?

डॉ. भोयर दक्षिण नागपुरातील प्रभाग ३१ मधून महापालिकेत प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यासोबत उषा पॅलेट, शीतल कामडी या निवडून आल्या होत्या. त्यामुळे या नगरसेविका त्यांच्यासोबत कॉंग्रेसमध्ये जाणार काय? याशिवाय भोयर यांच्यासोबत आणखी कोण भाजप सोडणार? असे प्रश्न राजकीय वर्तूळात उपस्थित होत आहेत.

loading image
go to top