esakal | शरद पवार भूतकाळ, वर्तमानकाळ अन् भविष्यकाळही - विजय वडेट्टीवार

बोलून बातमी शोधा

vijay wadettiwar about sharad pawar on his birthday

राजकारणातील वादळाची दिशा त्यांना कळते. भविष्यात राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे, याचा अंदाज त्यांना आधीच येतो. या विषयात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. 

शरद पवार भूतकाळ, वर्तमानकाळ अन् भविष्यकाळही - विजय वडेट्टीवार
sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर : शरद पवारांचा उल्लेख योद्धा म्हणूनच केला जातो. ८० वर्षांचे शरद पवार, असे म्हटले जाते. पण ८० वर्षांचे म्हातारे, असा उल्लेख त्यांचा कुणीही करत नाही. कारण तरुणांनाही लाजवेल असा उत्साह, अशी ऊर्जा त्यांच्यात ८१व्या वर्षीही आहे. ते भूतकाळ आहेत, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही आहेत, अशा भावना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केल्या. 

हेही वाचा - Powerat80 : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले साहेबांबद्दल...

राजकारण आणि समाजकारणात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने त्यांना गुरू मानावे, असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. लहान कार्यकर्ता, मोठा कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असो न रागवता त्यांचा पूर्ण सन्मान कायम राखून ते मार्गदर्शन करतात. राजकारणातील वादळाची दिशा त्यांना कळते. भविष्यात राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे, याचा अंदाज त्यांना आधीच येतो. या विषयात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. 

हेही वाचा - दोन वाघ एकमेकांवर भिडले, लढाईदरम्यान एकाचा मृत्यू

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेच्या वेळी त्यांच्यातला आत्मविश्‍वास आणि चेहऱ्यावरचे तेज बघण्यासारखे होते. त्यांची तगमग होत होती. पण तेवढेच ते शांत होते. आम्हा सर्वांना काळजी लागून राहिली होती की काय होणार पुढे. पण पवार साहेब कमालीचे शांत होते. जणू काही त्यांना ज्ञात होते की, सरकार आपले बनणारच आहे, फक्त चार-दोन दिवस मागेपुढे होईल. त्यावेळी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचीदेखील भूमिका सकारात्मक होती. या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले पाहिजे. या सर्व घडामोडींमध्ये पवारांनी जी भूमिका वठवली. त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकले. 

हेही वाचा - उपराजधानीत ऑनर किलिंग : बहिणीच्या प्रियकराचा भावाने केला खून; तीन दिवसांतील तिसरे...

कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते ते साध्य झाले. ही दूरदृष्टी केवळ आणि केवळ पवार साहेबांमध्येच असू शकते. ती इतर कुणाला अद्याप तरी लाभलेली आहे, असे वाटत नाही. आज ते ८० वर्षांचे झाले, ते शतायुषी व्हावे. महाराष्ट्रातील आणि देशातील राजकारण बदलावे. ते बदलण्याची ताकद, कौशल्य आणि बुद्धीचातुर्य शरद पवारांमध्ये आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 

हेही वाचा - शासकीय कर्मचाऱ्यांनो, आता कार्यालयात जिन्स पॅन्ट, टी-शर्ट अन् स्लीपर्सवर बंदी

माणसांची पारख हे शरद पवारांचे मोठे वैशिष्ट्य़ आहे. ज्या लोकांना ते पारखतात त्यांच्याबद्दल त्यांना कमालीची खात्री असते. एक असेच काम २० वर्षांपासून रखडलेले होते. ते काम माझ्या खात्याशी संबंधित होते. काही लोक पवारांना भेटायला गेले. त्यांना पवारांनी सांगितले की, तुम्ही विजय वडेट्टीवारांकडे जा. तुमचे काम निश्‍चित होईल. पण त्यांनी स्वतः मला त्याबाबत काहीही सांगितले नव्हते. मी सुद्धा केवळ दोन बैठकांमध्ये ते काम मार्गी लावले. आपल्या माणसांबद्दल खात्री असणे, हे त्यांचे स्वभावविशेष आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.