राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर लवकरच येणार वेबसिरीज; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मान्य केली मागणी

Web series coming on life of Rashtrasant Tukdoji Maharaj
Web series coming on life of Rashtrasant Tukdoji Maharaj

नागपूर  ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी ठरावे यासाठी त्यांच्या आयुष्यावर वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या वेबसिरीजसाठी निधीची मागणी केली. ती मागणी अजित पवार यांनी मान्य केली असून लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेबसिरीज येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

या संदर्भात सुरुवातीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती व प्रसारण विभागाचे संचालक श्री आंबेकर व त्यांच्या सहकार्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत आज चित्रपटापेक्षा वेबसिरीजला जास्त प्रतिसाद असल्याने ती तयार करण्यात यावी, यावर सविस्तर चर्चा झाली. ज्या नवीन पिढीपर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचावे ती आज मोबाईल, लॅपटॉपवर जास्त असते. त्यामुळे चित्रपटापेक्षा वेबसिरीजला जास्त प्रतिसाद मिळेल, असा सुर या बैठकीतून आला. त्यामुळे वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या शिष्टमंडळात आचार्य वेरुळकर गुरुजी, भाष्कराव विघे, गुहाडे महाराज, अरविंद काळमेघ, डॉ. नरेंद्र तरार, रवी डावले, रामेश्वर बघरट, राजदत्त मायालु यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. श्री संत तुकडोजी महाराज प्रचार व प्रक्षिशण संस्था, दासटेकडी, गुरुकुंज मोझरी जि. अमरावती ही संस्था गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रसंतांवर एखादा चित्रपट व्हावा जेणेकरून त्यांचे विचार हे नवीन पिढीला कळावे, यासाठी प्रयत्न करीत आहे. विदर्भातील जवळपास ३६ आमदार तसेच खासदारांनी या मागणीची पत्रे राज्य शासनाला सादर केली आहेत.

यानंतर अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेऊन या वेबसिरीजसाठी लागणाऱ्या खर्चाला मंजुरी मिळण्यासाठी मागणी केली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com