हिवाळी अधिवेशन : राजभवन, विधान भवनाची अग्निसुरक्षा यंत्रणा बंद

हिवाळी अधिवेशन
हिवाळी अधिवेशनहिवाळी अधिवेशन

नागपूर : हिवाळी अधिवेशनाबद्दल अद्यापही अनिश्चितता असली तरी प्रशासन तयारीला लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सरकारी व निमसरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी करण्यात आली. राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाउस या अतिमहत्त्वाच्या इमारतीसह प्रमुख इमारती व कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

भंडारापाठोपाठ अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर सरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सरकारी यंत्रणाअद्यापही याबद्दल गंभीर नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाउस, आमदार निवास यासह शहरातील २८ सरकारी इमारती व विश्रामगृहातील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली.

हिवाळी अधिवेशन
वि. प. निवडणूक : महाविकास आघाडीविरुद्ध भाजपला उमेदवार मिळेना!

कुठे ही यंत्रणा नाही, तर कुठे यंत्रणा आहे, पण ती कार्यरत नसल्याचे उघडकीस आले आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसलेल्या कार्यालयांना अग्निशमन विभागाच्या अधिनियमातील कलम ६ नुसार नोटीस बजावली आहे. नोटीस बजावल्यानंतरही सुरक्षा यंत्रणा कार्यरत न केल्यास संबंधित कार्यालयांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे.

सरकारी विश्रामगृहातही यंत्रणा बंदच

अधिवेशन काळात महत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या विश्रामगृहातही अग्निशमन यंत्रणा कार्यरत नाही. त्यांनाही नोटीस बजावली आहे. अधिवेशन आले की कार्यालये व विश्रामगृहातील यंत्रणेची तपासणी केली जाते. जीवन विमा निगम कार्यालय, सिव्हिल लाइन परिसरातील प्रशासकीय इमारती, जलसंपदा विभागाचे कार्यालय अशा महत्त्वाच्या कार्यालयात अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

हिवाळी अधिवेशन
ग्रीन मोनोकनी बिकनीमध्ये अनुष्काचा फोटो पाहून विराट म्हणाला...

अग्निशमन विभागाने तपासणी केलेली कार्यालये

  • विधानभवन व परिसरातील इमारती

  • राज्यपालांचे निवासस्थान असलेले राजभवन

  • मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेले रामगिरी

  • उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान देवगिरी

  • सिव्हिल लाइन येथील रवी भवन व नाग भवन

  • हैदराबाद हाउस

  • सुयोग बिल्डिंग

  • आमदार निवास

  • १६० खोल्यांचे गाळे

  • वनामती (रामदासपेठ)

  • सेमिनरी हिल्स येथील सी.पी.डब्ल्यू. विश्रामगृह

  • डब्ल्यूसीएल विश्रामगृह, सिव्हिल लाइन

  • डब्ल्यूसीएल विश्रामगृह, कल्पनानगर

  • रेल्वे क्लब विश्रामगृह

  • रेल्वे सातपुडा विश्रामगृह

  • एम.ई.सी.एल. विश्रामगृह

  • एनपीटीआय विश्रामगृह

  • राष्ट्रीय केमिकल फर्टीलायजर विश्रामगृह

  • वन विभाग विश्रामगृह

  • ऑटोमिक एनर्जी विश्रामगृह

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या सरकारी इमारतीतील अग्निरोधक यंत्राची गेल्या महिन्यात तपासणी करण्यात आली. त्याकाळात काही त्रुट्या आढळून आल्या आहेत. त्या दुरुस्त व उपाययोजना करण्यासंदर्भात बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. याशिवाय अधिवेशनासाठी बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था व्हीआरसीई, वनामती, निरी या ठिकाणी करण्यात येते. तेथीलही राहण्याची व्यवस्थांची पाहणी करण्यात आली आहे. त्यात काही त्रुटी आढळल्या. त्यांची दुरुस्ती करावी व ते सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने सादर करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
- राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com