GST: बनावट बिल तयार करुन कोट्यवधींचा चोरला जीएसटी, लाकूड व्यावसायिकावर मोठी कारवाई

नावट जीएसटी बिले तयार करून कोट्यवधीचा जीएसटी चोरी केल्याप्रकरणी आज राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने एका लाकूड व्यावसायिकावर मोठी कारवाई केली.
gst filing and reply to notice on online portal
gst filing and reply to notice on online portalsakal News

GST Raid: बनावट जीएसटी बिले तयार करून कोट्यवधीचा जीएसटी चोरी केल्याप्रकरणी आज राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने एका लाकूड व्यावसायिकावर मोठी कारवाई केली. त्यामुळे बाजारात विविध प्रकारची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसी येथील विनोद गोयनका यांच्या लकडगंज येथील टिंबर मार्ट येथे जीएसटीची चमू सकाळीच पोहोचली.

मध्यंतरी विभागाने शहरातील ५५० खातेदाराची कसून चौकशी केली होती. दरम्यान, शहरातील गोयनका यांच्याकडील व्यवहारात बनावट जीएसटीच्या बिलाच्या आधारे कराची चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार मुंबई गुप्तचर विभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाने सर्व राज्यांच्या जीएसटी विभागांना बनावट जीएसटी बिले आणि आयटीसी बनवणाऱ्यांची ओळख पटविण्याचे निर्देश दिले होते. या तपासणीनंतर सापडलेल्या मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे.

त्याअनुषंगाने गोयनका यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बनावट चलनासह जीएसटीची चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(Latest Marathi News)

gst filing and reply to notice on online portal
T20 World Cup 2024 Schedule : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी! तर 'या' दिवशी पाकिस्तानशी रंगणार थरार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com