Yavatmal Marriage Extortion:'दुसऱ्या मुलाशी लग्न करायचं असेल तर दोन लाख दे'! उपवधूकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

एका तरुणाने तुला दुसऱ्याशी लग्न करायचे असेल तर, आई-वडिलांकडून दोन लाख रुपये आणून दे अन्यथा उपवर-उपवधूला जिवाने मारून टाकीन, अशी धमकी दिली.
Yavatmal Marriage Extortion:'दुसऱ्या मुलाशी लग्न करायचं असेल तर दोन लाख दे'! उपवधूकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

Yavatmal Marriage Extortion Case: तालुक्यातील माणिकवाडा येथील एका तरुणीचे लग्न जुळले. एका तरुणाने तुला दुसऱ्याशी लग्न करायचे असेल तर, आई-वडिलांकडून दोन लाख रुपये आणून दे अन्यथा उपवर-उपवधूला जिवाने मारून टाकीन, अशी धमकी दिली. घाबरलेल्या उपवधूने रविवारी (ता.१८) नेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

कुणाल बाहुटे (रा. माणिकवाडा), असे गुन्हा नोंद झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मागील काही दिवसांपासून तरुणीचा पाठलाग करीत होता. ही बाब तिने घरी सांगितल्यावर सदर तरुणाची पालकांनी समजूत काढली. मात्र, त्याने पाठलाग करणे बंद केले नाही. दोन महिन्यांपूर्वी तरुणीचे साक्षगंध झाले होते. (Latest Marathi News)

लग्नपत्रिका नातेवाइकांना वाटण्यासाठी लग्नाची तयारी सुरू होती. भ्रमणध्वनीवर तू जर दुसऱ्या मुलासोबत विवाह केल्यास गावात बदनामी करतो. तुझे लग्न होऊ देणार नाही. अशाप्रकारे धमकावत दोन लाखांची मागणी केली.

Yavatmal Marriage Extortion:'दुसऱ्या मुलाशी लग्न करायचं असेल तर दोन लाख दे'! उपवधूकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल
Nagpur Cyber Crime: नागपुरात सायबर चोरांची वाढली हिम्मत! माजी पोलिस महासंचालकाच्या नावाने लुबाडण्याचा प्रयत्न

यावर त्याचे समाधान न झाल्याने लग्न जुळलेल्या मुलाला धमकी दिली. या प्रकरणी नेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.(Latest Marathi News)

Yavatmal Marriage Extortion:'दुसऱ्या मुलाशी लग्न करायचं असेल तर दोन लाख दे'! उपवधूकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल
World Record: 4 महिन्याच्या कैवल्याची कमाल, नावावर केला जागतिक विक्रम; जाणून घ्या त्याची हुशारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com